mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांनो! कमी जागेत जास्तीत जास्त नफा मिळवून देणारी बायोफ्लॉक मत्स्यशेती आता मंगळवेढयात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 4, 2021
in मंगळवेढा, राज्य
पाटखळ येथे गिलनेट फिशरीज अँड ऍग्रो फार्मचे पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते उद्घाटन

गिलनेट फिशरी अँड ऍग्रोसोबत बायोफ्लॉक तंत्रज्ञानाचा वापर करून मत्स्यशेती करा अन लाखो रुपये कमवा!

समाधान फुगारे । न्युज मंगळवेढा टाईम्स 

जास्तीत जास्त नफा मिळवून देण्यासाठी निरोगी मासे तयार करणे हे मत्स्यपालनाचे उद्दीष्ट आहे. सध्‍याच्‍या काळात बायोफ्लॉक तंत्रज्ञान खूप मोठ्या प्रमाणावर सक्रिय होत असून मस्‍त्‍य उत्‍पादनासाठी हे तंत्रज्ञान आर्थिकदृष्‍टया किफायतशीर ठरत आहे. त्‍यामुळे हे शेतीला शाश्‍वत उत्‍पादन देणारे महत्‍त्‍वाचे बायोफ्लॉक तंत्रज्ञान आहे.

मंगळवेढा तालुक्यातील पाठखळ (युटोपीयन शुगर्सच्या समोर) येथे पहिल्यांदाच सुरु असलेल्या उपक्रमात सोलापूर जिल्हा प्रशासनाने सघन जलचरांना प्रोत्साहन देण्यासाठी बायोफ्लॉक शेती तंत्रज्ञान सादर केले.

गिलनेट फिशरी अँड ऍग्रो फार्मचे संचालक आंनद ताड म्हणाले, बायोफ्लॉक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकरी 3 गुंठे क्षेत्रात 7 कृत्रिम टाक्यांमध्ये मासे वाढवू शकतात.

बायोफ्लॉक तंत्रज्ञानामुळे प्रत्येकी 3 गुंठे क्षेत्रामध्ये लहान टाक्यांमध्ये 4 ते 5 हजार किलोग्राम मासे तयार होऊ शकतात.

लोकांनी पुढे यावे आणि या योजनेचा लाभ घ्यावा अशी आमची इच्छा आहे. प्रधान मंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) अंतर्गत केंद्र सरकार या उपक्रमासाठी 40 ते 60 टक्के अनुदान देखील देते.

बायोफ्लॉक तंत्रज्ञानाचे फायदे

कमी जागेत व कमी कालावधीत कमी पाण्यामध्ये बायोफ्लॉक तंत्रज्ञान प्रभावी उत्‍पन्‍न देणारे आहे. शेतीला शाश्‍वत उत्‍पादन देणारा एक पूरक व्‍यवसाय होतो. एकदाच गुंतवणूक आहे, परंतु वर्षांतून दोन वेळेस उत्‍पन्‍न देणारे आहे.

अत्‍यल्‍प व अल्‍पभूधारक शेतक-यांना आर्थिकदृष्‍टया परवडणारे आहे. उत्‍तम दर्जेचे व चांगल्‍या गुणवत्‍तेचे मत्‍स्‍य उत्‍पादन मिळते.

बायोफ्लॉक तंत्रज्ञान म्हणजे काय?

बायोफ्लॉक तंत्रज्ञान (बीएफटी) हे मत्स्यपालनात “निळ क्रांती” मानले जाते. हे एक पर्यावरणास अनुकूल जलसंपदाचे तंत्र आहे जे शेतीत पर्यावरणाचे नियमन वाढविण्यासाठी विकसित केले गेले आहे.

हे एक इझ्राईल तंत्रज्ञान पद्धत आहे.  सदर टाक्यातील पाण्याचा उपयोग हा फळ बाग,भाजी व इतर शेतीसाठी वापर करता येतो.

बायोफ्लॉक तंत्रज्ञानाचा हेतू काय आहे?

तपमान, विरघळलेल्या ऑक्सिजनची पातळी इत्यादी पाण्याचे पीएच स्तर तपासल्यानंतर ही पद्धत लागू केली जाऊ शकते.

बायोफ्लॉकची रचना आणि पौष्टिक मूल्य:

भारतामध्ये मत्स्यपालनाची बायोफ्लॉक पद्धती ही नवीन आहे. या तंत्राविषयी शेतकरी, व्यावसायिकांमध्ये संभ्रम आहे. या तंत्राविषयी अधिक माहिती घेऊयात.

पारंपारिक मत्स्य व्यवसाय शेततळ्यांमध्ये केला जातो. मात्र, या पद्धतीमध्ये खाद्य वाया जावून उत्पादन खर्चात वाढ होते. पर्यायाने नफा कमी होतो. त्याच प्रमाणे शेततळ्यातील वातावरणावर आपल्याला फारसे नियंत्रण ठेवता येत नाही. माशांची वाढ नियमित होत आहे किंवा नाही, होणारे आजार यावरही व्यवस्थित लक्ष ठेवणे अशक्य होते.

पूर्व आशियातील इझ्राईल, इंडोनेशिया, जपान व चीन या देशांमध्ये आधुनिक बायोफ्लॉक पद्धतीचा वापर मत्स्यपालनासाठी अनेक वर्षापासून केला जात आहे.

मत्स्यपालन हे फायदेशीर राहण्यास मदत झाली आहे. या पद्धतीत खाद्याचे नियोजन, रोगांचे नियंत्रण व उपचार करणे सोपे आहे. बायोफ्लॉक पद्धतीमध्ये सुक्ष्मजीवांचा वापर करून उर्वरित अन्न, माशांची विष्ठा व अन्य घटकांचेही माशांच्या नैसर्गिक खाद्यात रुपांतरण केले जाते.

हे सातत्याने बनणारे पोषक अन्न माशांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर ठरते. खाद्यांचा खर्च पर्यायाने उत्पादन खर्चात बचत होते. सूक्ष्मजीवांमुळे पोषक घटक व सूक्ष्म वातावरण तयार होऊन माशांना होणारी रोगराई व सामान्य आजार यांचे प्रमाण अत्यंत कमी राहते. माशांची वाढ उत्तम होते.

बायोफ्लॉक पद्धतीचा अवलंब

छोटे व मोठे शेतकरी, व्यावसायिक किंवा  बेरोजगार तरूण मंडळी या तंत्राने मत्स्यपालन करू शकतात.
हा व्यवसाय बायोफ्लॉक पद्धतीने व चिकाटीने केल्यास स्वयंरोजगाराचे उत्तम साधन ठरू शकते.

यासाठी एक टारपुलीन टँक (15 हजार लिटर क्षमता, 5 डाया मीटर) आवश्यक असतो. 7 टँकचा संपूर्ण खर्च साधारणपणे 5 लाख 50 हजार रुपयांपर्यंत येतो.

यासाठी फक्त 40× 80 फूट जागा लागत असल्याने अल्पभूधारक शेतकरीही ते करू शकतो.

व्यवसायाची सुरुवात

व्यवसाय सुरू करण्याआधी चांगल्या संस्थेतून किमान 2 ते 3 दिवसाचे प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक आहे.

पहिले छोट्या सेटअपपासून (7 टँक)  सुरूवात करावी. नंतर आपल्या अनुभवानुसार व्यवसायात वाढ करत जावी. एकदम मोठे धाडस करण्याची आवश्यकता नाही.

माशांच्या सामान्य प्रजाती विशेषतः बाजारामध्ये सहज, चांगल्या दरात विकल्या जाणाऱ्या प्रजाती बायोफ्लॉकमध्ये पाळाव्यात.

माशांच्या ‘या’ प्रजाती करू शकतो

चिलापी, पाबदा, शिंगी, व्हीतनाम कोई, रुपचंद, फंगेशीयश, पंकज आदी प्रजातींची या टाक्यांमध्ये मत्स्यव्यवसाय करू शकतो.

व्यवसाय सुरू करण्यासाठी येथे करा संपर्क

मंगळवेढा तालुक्यातील पाठखळ येथील गिलनेट फिशरी अँड ऍग्रोच्या माध्यमातून हा व्यवसाय आपण सुरू करू शकता.

व्यवसाय सुरू करणाऱ्या प्रत्येकाला संस्थेमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. शेतकऱ्यांनी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर बायोफ्लॉक मत्स्य शेती सुरू करता येणार आहे.

77 90 992 992 व 78 09 99 11 55

येथे आपण संपर्क करून अधिक माहिती घेऊ शकता.

बाजारपेठ येथे उपलब्ध

आपल्या परिसरातील बाजारपेठेत सुद्धा हे ताजे मासे आपण विकू शकता..अन्यथा गिलनेट फिश ऍग्रोच्या माध्यमातून कंपनी आपल्याकडून मासे खरेदी करेल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: गिलनेट फिशरीजमंगळवेढा

संबंधित बातम्या

खळबळ! सोलापूरात महिलेवर अत्याचारप्रकरणी एका पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

भिगवण तरुणी अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट, तरुणीचा रवानगी सुधारगृहात; आता तरुणाचं काय होणार? तरुणीचे धक्कादायक शपथपत्र

February 21, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेत आणि पाणंद रस्त्यांसाठी प्रशासकीय हालचालींना वेग; शेतकऱ्यांनी थेट तहसीलदारांशी संपर्क साधण्याचे आवाहन; आमदार आवताडेंचा शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार

February 21, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

खळबळजनक! दहावीच्या परीक्षेत १० ‘मुन्नाभाई’; तरुणीसह २० जणांवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; केंद्र संचालकांच्या सतर्कतेने मोठा रॅकेट उघड

February 21, 2026
देखो चॅंद आया ! जाणून घ्या ‘या’ वर्षातील रमजानमधील सेहरी आणि इफ्तारची भारतातील वेळ

आल्हाददायक! तब्बल ३० वर्षांनी निसर्गाची साथ, फेब्रुवारीत रमजान आल्याने वाढत्या तापमानाची चिंता मिटली; रोजेधारकांसाठी यंदाचा महिना ठरणार सुखद

February 20, 2026
​सहकार आणि समाजकारणाचा सुवर्णसंगम म्हणजे स्व.सुभाष शहा; आमदार समाधान आवताडे यांनी जागवल्या आठवणी

​सहकार आणि समाजकारणाचा सुवर्णसंगम म्हणजे स्व.सुभाष शहा; आमदार समाधान आवताडे यांनी जागवल्या आठवणी

February 19, 2026
मनोहर (आप्पा) रोकडे नागरी बिगरशेती पतसंस्थेचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

मनोहर (आप्पा) रोकडे नागरी बिगरशेती पतसंस्थेचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

February 19, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

February 18, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

February 18, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती नंतर जिल्हा परिषदेच्या निवडी; नव्या सदस्यांचे गॅझेट झाले प्रसिद्ध; निवडणूक कार्यक्रम होणार लवकरच जाहीर;..अशी असेल पुढची प्रक्रिया…

February 17, 2026
Next Post
पंतप्रधान मोदी आज लाँच करणार ‘संपत्ती कार्ड’; लाखो गावकऱ्यांना फायदा, महाराष्ट्रातल्या 100 गावांचा समावेश

मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा! 102 व्या घटना दुरुस्तीला मोदी सरकारची मंजुरी

ताज्या बातम्या

खळबळ! सोलापूरात महिलेवर अत्याचारप्रकरणी एका पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

भिगवण तरुणी अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट, तरुणीचा रवानगी सुधारगृहात; आता तरुणाचं काय होणार? तरुणीचे धक्कादायक शपथपत्र

February 21, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेत आणि पाणंद रस्त्यांसाठी प्रशासकीय हालचालींना वेग; शेतकऱ्यांनी थेट तहसीलदारांशी संपर्क साधण्याचे आवाहन; आमदार आवताडेंचा शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार

February 21, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

खळबळजनक! दहावीच्या परीक्षेत १० ‘मुन्नाभाई’; तरुणीसह २० जणांवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; केंद्र संचालकांच्या सतर्कतेने मोठा रॅकेट उघड

February 21, 2026
देखो चॅंद आया ! जाणून घ्या ‘या’ वर्षातील रमजानमधील सेहरी आणि इफ्तारची भारतातील वेळ

आल्हाददायक! तब्बल ३० वर्षांनी निसर्गाची साथ, फेब्रुवारीत रमजान आल्याने वाढत्या तापमानाची चिंता मिटली; रोजेधारकांसाठी यंदाचा महिना ठरणार सुखद

February 20, 2026
सोलापुरात गोपीचंद पडळकरांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर ‘धनगर’ समाजाच्या नेत्यांनीच केला संयोजकावर खुनी हल्ला

​सासूचा जीव घ्यायला निघाली, कुंकूच पुसलं गेलं! विषप्रयोग फसला, नराधम पत्नीचा सुसंस्कृत चेहरा बेनकाब; पत्नी, प्रियकराविरुद्ध महिन्यानंतर गुन्हा दाखल

February 20, 2026
​सहकार आणि समाजकारणाचा सुवर्णसंगम म्हणजे स्व.सुभाष शहा; आमदार समाधान आवताडे यांनी जागवल्या आठवणी

​सहकार आणि समाजकारणाचा सुवर्णसंगम म्हणजे स्व.सुभाष शहा; आमदार समाधान आवताडे यांनी जागवल्या आठवणी

February 19, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..