टीम मंगळवेढा टाईम्स।
राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी… राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. शरद पवार गटाकडून मात्र याबाबतचा दुजोरा देण्यात आलेला नाही अशी बातमी आज टीव्ही 9 मराठीने प्रसिद्ध केली आहे.
लोकसभा निवडणुकीसंदर्भात बोलवली बैठक
राज्यसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला राज्यात वेग आला आहे. राज्यसभा निवडणुकीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची मंगळवारी रात्री दोन तास बैठक झाली.
या बैठकीत उमेदवारांबाबत चर्चा झाली. मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सगे सोयरेचा कायदा करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरुच आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात सगेसोयऱ्यासंदर्भात आतापर्यंत ३० हजारापेक्षा जास्त हरकती आल्या आहेत. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
जोरदार हालचाली, महाराष्ट्र प्रभारींसह काँग्रेस नेते शरद पवारांच्या भेटीला, पडद्यामागे काय घडतंय?
अशोक चव्हाण यांनी आज भाजप पक्षात प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसचं मोठं नुकसान झालं आहे. अशोक चव्हाण हे बडे नेते आहेत. त्यामुळे भाजपला त्याचा फायदा होणार आहे. अशोक चव्हाण यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.
काँग्रेसच्या गोटात जोरदार हालचाली घडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे येत्या 28 फेब्रुवारीला राज्यसभेची निवडणूक आहे. तसेच लोकसभेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी अशाप्रसंगी भाजपात जाणं हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय.
अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. रमेश चेन्नीथला यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे जावून शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर रमेश चेन्नीथला यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
“मी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी बनल्यानंतर आज मी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यासोबत आम्ही शरद पवार यांची भेट घेतली. आम्ही महाविकास आघाडीबाबत त्यांच्यासोबत बातचित केली आहे. आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही जागावाटप आणि इतर गोष्टींबाबत आज चर्चा केली”, अशी माहिती रमेश चेन्नीथला यांनी दिली.
‘शरद पवारांसोबत दोन तास चर्चा’
“ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीदेखील आम्ही बातचित केली आहे. आम्ही लवकरात जागावाटप निश्चित करु. तसेच महाविकास आघाडीच्या कार्यक्रमाबाबतही चर्चा झालीय. शरद पवार यांच्यासोबत चांगली चर्चा घडून आली. जवळपास दोन तास चर्चा झाली. आम्ही विस्तारात चर्चा केली आहे. येत्या काळात महाविकास आघाडीचा कार्यक्रम सुरु होईल. आम्ही सर्व एकत्रितपणे काम करु”, असं रमेश चेन्नीथला म्हणाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज