mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! शरद पवार यांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या सदस्य समितीनं फेटाळला

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 5, 2023
in राज्य
राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष कोण होणार? ‘ही’ समिती करणार निवड; पाहा कोण आहेत सदस्य

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी. राष्ट्रवादीच्या सदस्या समितीनं शरद पवार यांनी घेतलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय फेटाळला आहे.

‘लोक माझे सांगाती’ याच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती.

शरद पवारांच्या घोषणेनंतर सभागृहात एकच गदारोळ झाला. साहेब निर्णय मागे घ्या, कार्यकर्त्यांनी मागणी करत ठिय्या दिला होता. तेव्हापासूनच शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्या, असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता.

शरद पवारांनी त्यावेळी चेंडू राष्ट्रवादीच्या सदस्य समितीच्या कोर्टात टोलावला होता. त्यामुळे समितीनं राजीनामा फेटाळल्यानंतर शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेर सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. सध्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गोंधळ पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच एका कार्यकर्त्यानं प्रदेश कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला.

पोलिसांकडून कार्यकर्त्यांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही कार्यकर्त्यांना वारंवार शांत राहण्याचं आवाहन करत आहेत. दरम्यान, शरद पवारांचं मुंबईतील निवासस्थान ‘सिल्वर ओक’वर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

अध्यक्ष निवडीच्या समितीत कोण आहे?

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड तसेच नरहरी झिरवळ, फौजिया खान,धीरज शर्मा, सोनिया दूहन यांचा समावेश आहे.

सदस्य समितीकडून ‘प्लॅन ए’, ‘प्लॅन बी’?

आज शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयावर समिती निर्णय देणार आहे. समिती काय निर्णय देणार याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे. अशातच एबीपी माझाला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचा ॲक्शन प्लॅन तयार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्य समिती आज दोन महत्त्वाचे प्रस्ताव मांडणार आहे. प्लॅन ए आणि प्लॅन बी असे दोन महत्त्वाचे प्रस्ताव समितीकडून मांडले जातील. पहिल्या प्रस्तावात शरद पवार यांनी आपल्या पदावर कायम राहावं असा निर्णय समस्य समिती देणार आहे.

ADVERTISEMENT

पहिल्या प्रस्तावाला शरद पवार कायम नसतील तर मात्र समिती दुसरा प्रस्ताव मांडणार आहे. दुसऱ्या प्रस्तावात एकमतानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांना समर्थन द्यावं, असं सुचवण्यात येणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: राष्ट्रवादीशरद पवार
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

मोठी बातमी! दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर; कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या

मोठी बातमी! दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर; कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या

June 1, 2023
अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा; राज्य सरकारने मानधनात केलेली वाढ ‘या’ महिन्यापासून मिळणार

June 1, 2023
शेतकऱ्यांसाठी व महिलांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; केंद्राच्या धर्तीवर राज्याचाही सहा हजारांचा कृषी सन्मान निधी; एसटी प्रवासात 50 टक्के सूट

मोठी बातमी! ‘या’ जिल्ह्याचे नाव बदललं, आता अहिल्यादेवीनगर म्हणायचं; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

June 1, 2023
गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

नमो! शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये आणि १ रुपयांत पीक विमा, मंत्रिमंडळाचा निर्णय

May 31, 2023
मंगळवेढ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांची बदली, राजश्री पाटील यांची नियुक्ती

मोठी बातमी! मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांची बदली; ‘हे’ असतील नवे DYSP

May 30, 2023
विद्यार्थ्यांनो! दहावी-बारावीनंतर ‘हे’ करा कॉम्प्युटर कोर्स, नोकरी व सर्वोत्तम करिअरसाठी फायदेशीर; अधिक माहिती जाणून घ्या..

विद्यार्थ्यांनो! बारावीचा निकाल आज जाहीर होणार; कुठे पाहता येणार निकाल? SMS वरती निकाल कसा पाहाल?

May 25, 2023
अखेर ठरले! महाविकास आघाडीची ‘या’ 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द

राष्ट्रवादी, ठाकरे गट, काँग्रेसची संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी चर्चेत; व्हायरल यादीत कुणाची नावं? सोलापूर, माढामध्ये…

May 24, 2023
सोलापूर जिल्ह्यातील अकरा ग्रामपंचायतींना सुंदर गाव पुरस्कार; मंगळवेढ्यातील ‘या’ गावाचा समावेश

सरपंचाने गावकऱ्यांसमोर मांडला कमिशनचा हिशोब; महिला सरपंचाने ग्रामस्थांना दिला आश्चर्याचा धक्का; खर्च, कमिशन संपूर्ण गोषवारा पुस्तकात केले नमूद

May 24, 2023
पुन्हा नोटाबंदी! 2 हजारांची नोट चलनातून बाहेर; आरबीआयचा मोठा निर्णय

नागरिकांनो! 2 हजाराच्या कितीही नोटा बँक खात्यात जमा करू शकता; ओळखपत्राची, फॉर्म भरण्याची गरज नाही

May 22, 2023
Next Post
राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष कोण होणार? ‘ही’ समिती करणार निवड; पाहा कोण आहेत सदस्य

ब्रेकिंग ! अखेर शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय घेतला मागे; म्हणाले...

ताज्या बातम्या

मोठी बातमी! दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर; कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या

मुलींची बाजी! मंगळवेढा तालुक्यात दहावी निकालात इंग्लिश स्कूलची ‘ही’ विद्यार्थ्यांनी राज्यात पहिली; शंभर टक्के निकालाच्या ‘या’ आहेत शाळा

June 2, 2023
भीतीदायक! मंगळवेढ्यात जीप आडवून दाेघांना लुटले, ६२ हजारांचा मुद्देमाल जबरीने नेला काढून; ‘या’ मार्गावरील घटना

ब्रेकिंग! मंगळवेढ्यात अवैध देशी, विदेशी दारूची वाहतूक करणारे पिकअप पकडले; 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; API अंकुश वाघमोडे यांची धडाकेबाज कामगिरी

June 2, 2023
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

खिडक्या थरथरल्या. भांडी खणखणली… मंगळवेढा परिसरात गूढ मोठा आवाज; ‘या’ गोष्टीचा असल्याचा अंदाज

June 2, 2023
उन्हाच्या झळा आणखी वाढणार; हवामान खात्यानं दिलेला ‘हा’ इशारा पाहून वेळीच सावध व्हा..!

सावधान! आज, उद्या जणू उष्णतेची लाटच; उगाचंच घराबाहेर नका पडू, ‘ही’ काळजी घ्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आवाहन

June 2, 2023
मंगळवेढा । DYSP पदाची सुत्रे विक्रांत गायकवाड यांनी स्विकारली; कारखाना रोडने होणारी अवैध वाळू वाहतूक रोखण्याचे असणार आवाहन

मंगळवेढा । DYSP पदाची सुत्रे विक्रांत गायकवाड यांनी स्विकारली; कारखाना रोडने होणारी अवैध वाळू वाहतूक रोखण्याचे असणार आवाहन

June 2, 2023
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

कोल्हापूर येथे उपोषणास बसलेले ते सर्व गुन्हेगारच; पोलिस निरिक्षक रणजित माने यांचे गंभीर आरोप

June 2, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा