mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पोटनिवडणुकीत भूमिपुत्राचा मुद्दा ऐरणीवर येणार! मंगळवेढा तालुक्यावर गेल्या तीन टर्म पासून अन्याय

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 17, 2021
in सोलापूर, मंगळवेढा, राजकारण, राज्य
रोहित पवारांच्या संपर्कातील मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातील ‘तो’ नेता कोणता ?

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सध्या वरवर शांतता दिसत असली तरी अंतर्गत हालचालींनी मोठा वेग पकडला आहे. (स्व) भारत भालके यांच्या निधनानंतर सहानुभूती कडे झुकणारी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता तुल्यबळ होते की काय? अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

तर दुसरीकडे मंगळवेढा तालुक्यातील मतदार संख्या जास्त असून देखील गेल्या तीन टर्म पासून उमेदवारीबाबत होत असलेला अन्याय इथल्या जनतेने कुठपर्यंत सोसायचा? आता नाही तर मग कधी? असे म्हणत भूमिपुत्राचा मुद्दा पुन्हा जनतेने हाती घेतला आहे.

परिचारकांपुढे सामाजिक समीकरणांचा  अडसर

प्रशांत परिचारक यांनी जनसंवादाचा वेग वाढवला असला तरी भाजपाच्या कमळावर मराठा कार्यकर्ता आणि सकल मराठा विचार मानणाऱ्या समाजाचे मतदान कितपत होईल ? ही साशंकता कायम आहे.

(स्व) भारत भालके यांच्या नेतृत्वचे कवच कुंडल नाहीसे झाल्यानंतर तर हा वर्ग प्रचंड अस्वस्थ आहे. तो आपला नेता शोधत आहे आणि कोणामध्ये हे भविष्यातील नेतृत्व म्हणून पाहायचे या विचारात या सगळ्यांच्या नजरा शरद पवार यांच्याकडे आहेत.

राष्ट्रवादी-भाजपाची गणित!

राष्ट्रवादी काँग्रेसला या जाती-धर्माच्या राजकारणात याबरोबरच आता हातात असलेली  जागा जाऊ द्यायची नाही, या दृष्टीने गणित मांडायचे आहे. तर भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा परिचारकांना मैदानात उतरवून संधी मिळते का? हे पाहण्यापेक्षा एखादा मराठा उमेदवाराला उतरवून ही जागा खेचून घेता येईल का ? याचे गणित मांडायचे आहे.

प्रशांत परिचारक किंवा त्यांचे बंधू राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाण्यास तयार आहेत परंतु त्यांना घेतल्यानंतर पक्षाला निश्चित फायदाच होईल ?  याबाबत सध्या पक्षश्रेष्ठी चाचपणी करीत असल्याचे दिसते.

भालके यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी भगीरथ भालके यांच्या बाबत सहानुभूती व्यक्त केली परंतु ती निवडणुकीच्या उमेदवार जाहीर करेपर्यंत टिकेल का ?  याबाबत साशंकता आहे.

अवताडे यांचा पर्याय…

या सगळ्या पार्श्वभूमीवर समाधान आवताडे यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या तीन टर्म पासून उमेदवारीबाबत मंगळवेढा वर होत असलेला अन्याय, पंढरपूर पेक्षा त्या तालुक्यात असलेले अधिकचे मतदान, तेथे एकाच उमेदवाराची असलेले पक्की मांड आणि नवमतदारांच्या दृष्टीने असलेला ‘उद्योजकीय दृष्टिकोण’ला मिळणारा कौल हे या निवडणुकीतील कळीचे मुद्दे ठरू शकतात.

मतविभागणीचा धोका कमी

पंढरपुर तालुक्यात भालके-परिचारक यांच्यात मतविभागणी होऊ शकते.परंतु मंगळवेढा मध्ये 2019 च्या निवडणुकीत समाधान आवताडे यांनी तब्बल 174 बूथवर प्रथम क्रमांकाचे मिळवलेली मते आणि पंढरपूरमध्ये रोवलेले पाय पाहता ही निवडणूक बऱ्यापैकी त्यांच्याकडे झुकत असल्याचे दिसते .

मंगळवेढ्यात असलेले एकछत्री नेतृत्व आणि मराठा समाजाची पसंती या दोन मुद्द्यांवर ते  डार्क हॉर्स ठरतात की काय? अशी शक्यता वाटत आहे. 1 लाख 74 हजार मतदान मंगळवेढा तालुक्याचे तर पंढरपूर तालुक्याचे 1 लाख 54 हजार मतदान आहे.

पंढरपुरात विठ्ठल आणि पांडुरंग परिवारात मतविभागणी मोठ्या प्रमाणात होते, परंतु भारत भालके यांच्या नंतर आता  मंगळवेढ्यात अवताडे यांना मोठे आव्हान नाही. तेथे परिचारक यांचा गड आजही मजबूत नाही.

शैला गोडसे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणार?

शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सोलापूर जिल्हाच्या नेत्या शैला गोडसे यांनी 2019 च्या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी खूप धडपड केली पण मंगळवेढा-पंढरपूरची जागा भाजपला गेल्याने त्यांची कोंडी झाली होती.

मात्र पक्षासाठी त्यांनी माघार घेतली पक्षाची एकनिष्ठ राहिलेल्या शैला गोडसे यांची पक्षश्रेष्ठींनी दखल घ्यायला हवी होती अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत होती.

शिवसेनेवर नाराज असलेल्या शैला गोडसे यांनी या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही असा निश्चय करून आपल्या सामाजिक राजकीय कामाच्या जोरावर मतदारसंघाच्या विकासासाठी ही निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

उद्योजकीय दृष्टिकोन हा महत्त्वाचा मुद्दा

सामाजिक समीकरणे अशी असली तरी आता नवी पिढी ही जाती-धर्मावर नाही तर विकासाच्या विचारावर आणि दृष्टिकोनावर मतदान करत आहे.

आजपर्यंत भालके,परिचारक यांच्या कडे सत्ता देऊन बघितली. दोन्ही तालुक्यात फारसा फरक पडलेला नाही.मुळात उद्योजक असलेले समाधान आवताडे यांच्या हातात सत्ता दिली तर ते नेमके काय करतात?  हे एकदा पहावे तरी…हा एक दृष्टिकोन युवकांमध्ये आहे.

पांडुरंगाच्या साथीने आवताडे यांचा जॅकपॉट?

राष्ट्रवादीने जर परिचारकांना स्वीकारलेच नाही आणि ते भाजपा मध्येच राहिले तर भाजपाच्या प्रदेश पातळीवरून समाधान आवताडे यांना उमेदवारी देऊन त्यांच्यासाठी पांडुरंग परिवाराची ताकत पंढरपुरामध्ये लागली गेली तर त्यांचा विजय निश्चित असेल, परंतु एकदा ‘बसायला पाट’ दिला की तो पुन्हा मिळवणे अवघड होते हा अनुभव सध्या परिचारक गट घेत असल्यामुळे आता प्रशांत परिचारक हे अन्य कोणाला उमेदवारी देण्याच्या मानसिकतेत नाहीत.

परंतु भाजपने विधानसभा आणि विधानपरिषद अशी काही रचना केली आणि अवताडे यांच्यासाठी ‘पांडुरंग’ ताकत लागली गेली तर या दोन्ही जागा भाजपाला मिळू शकतात.

आवताडे यांची मंगळवेढ्यातील भक्कम स्थिती आणी पंढरपूर तालुक्यातून पांडुरंग परिवाराचा जर संभवित टेकू मिळाला त्यांची त्यांचा विजय निश्चित होऊ शकतो – आपल्या पक्षाला एक आमदारकी मिळू शकते हा विचार भाजपा करु शकतो.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसलाही आपल्या सर्व परिस्थितीचा दूरगामी विचार केला पाहिजे. पंढरपूर आणि मंगळवेढा तालुका हा तसा राष्ट्रवादी काँग्रेसचाच बालेकिल्ला आहे. आज नेतृत्व नसले तरी स्वतः शरद पवार हीच राष्ट्रवादीची खरी ताकद आहे.

अनेकदा पवारांच्या एक-दोन भाषणाने संपूर्ण मतदारसंघातील वातावरण बदलून गेल्याची उदाहरणे आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिलेला शब्द, सहानुभूती, न्याय यापेक्षा जिंकून येण्यास सक्षम त्याच्या मागेच राष्ट्रवादी उभी राहील हे त्यांचे राजकीय गणित असते.  त्यामुळे भालके यांच्या बाबत किती प्रामाणिकपणे पक्षश्रेष्ठी विचार करतील ? याबाबत साशंकता आहे.

ही जागा कुठल्याही परिस्थितीत पक्षाच्या हातातून जाऊ नये याच गणित राष्ट्रवादी काँग्रेस निश्चितच मांडणार आहे.

भागीरथ भालके यांची स्थिती…

जर राजकारणा मधून भालके घराणे संपायचे नसेल तर कुठल्याही परिस्थितीत भगीरथ भालके यांनी स्वतः करिता राष्ट्रवादीची उमेदवारी आणणे गरजेचे आहे.

विठ्ठलची असमाधानकारक परिस्थिती, जवळच्याच संचालकांची चलबिचल आणि अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून तयार होणारे आव्हान पाहता, सध्या त्यांची ‘उमेदवारी’  आणि राष्ट्रवादीकडून ठाम पाठराखण हीच त्यांना संजीवनी देऊ शकते.

उमेदवार कोण? हा सध्या कळीचा प्रश्न आहे. प्रशांत परिचारक हे भाजपचे उमेदवार असतील याची निस्चीती नाही तर भगीरथ भालके यांनाही राष्ट्रवादीची उमेदवारी हमखास मिळेलच याची शाश्वती नाही.

या निवडणुकीपुरता ‘सहानुभूतीपूर्वक’ उमेदवार देण्यापेक्षा लॉंग टर्म राजकारणात टिकणारा चेहरा राष्ट्रवादीला दिला पाहिजे, अन्यथा दोन वर्षानंतर येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा पक्षासमोर मोठे आव्हान उभे राहील अशी चर्चा पक्षात सुरू आहे. (स्रोत : पंढरी संचार)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उमेश परिचारकपोटनिवडणुकप्रशांत परिचारकभगीरथ भालकेमंगळवेढा पंढरपूर मतदारसंघशैला गोडसेसमाधान आवताडे

संबंधित बातम्या

शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

November 27, 2025
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

November 27, 2025
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निकाल न्यायालयाने ठेवला कायम; नगराध्यक्षपदाची निवडणूक नियोजित वेळेत की पुढे ढकलणार? सस्पेन्स कायम

November 27, 2025
सौ.अंजुम इरफान सय्यद यांची प्रचारात आघाडी, मंगळवेढा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. 1 मध्ये अंजुम सय्यद यांचा जोरदार प्रचार

सौ.अंजुम इरफान सय्यद यांची प्रचारात आघाडी, मंगळवेढा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. 1 मध्ये अंजुम सय्यद यांचा जोरदार प्रचार

November 27, 2025
आप्पा की गॅरंटी! मंगळवेढ्याचा चेहरामोहरा बदलणारा जाहीरनामा भाजपकडून प्रसिद्ध.. वाचा सविस्तर; कोणासाठी काय-काय?

आप्पा की गॅरंटी! मंगळवेढ्याचा चेहरामोहरा बदलणारा जाहीरनामा भाजपकडून प्रसिद्ध.. वाचा सविस्तर; कोणासाठी काय-काय?

November 27, 2025
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांची आता खैर नाही! परिवहन विभागाच्या मदतीने कडक धोरणाची अंमलबजावणी; अशी होणार कारवाई शिक्षा

November 27, 2025
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! आठ हजारांची लाच स्वीकारताना तालुका कृषी अधिकारी अडकला; ‘या’ कारणांसाठी घेतली लाच; सोलापूर जिल्ह्यात खळबळ

November 27, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

तिहेरी अपील प्रकरणामुळे राजकीय तापमान चांगलेच चढले; उमेदवारांमधील कायदेशीर संघर्षाने निवडणूक प्रक्रियेला वेगळे वळण; आजच्या निर्णयाकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष

November 27, 2025
दामाजीनगर ग्रामपंचायत हद्दीतील सद्‌गुरु बैठक (भिवाची वाट) रोडचे कॉकीटीकरण कामाबाबत अडवणुकीचा आरोप चुकीचा व दिशाभूल करण्याचा

दामाजीनगर ग्रामपंचायत हद्दीतील सद्‌गुरु बैठक (भिवाची वाट) रोडचे कॉकीटीकरण कामाबाबत अडवणुकीचा आरोप चुकीचा व दिशाभूल करण्याचा

November 26, 2025
Next Post
संतापजनक! दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीचा डोक्यात कुऱ्हाड घालून खून

धक्कादायक! कर्जाचा हप्ता मागायला गेलेल्या सोलापूरच्या तरुणाचा कर्जदाराने केला खून

ताज्या बातम्या

शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

November 27, 2025
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

November 27, 2025
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निकाल न्यायालयाने ठेवला कायम; नगराध्यक्षपदाची निवडणूक नियोजित वेळेत की पुढे ढकलणार? सस्पेन्स कायम

November 27, 2025
सौ.अंजुम इरफान सय्यद यांची प्रचारात आघाडी, मंगळवेढा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. 1 मध्ये अंजुम सय्यद यांचा जोरदार प्रचार

सौ.अंजुम इरफान सय्यद यांची प्रचारात आघाडी, मंगळवेढा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. 1 मध्ये अंजुम सय्यद यांचा जोरदार प्रचार

November 27, 2025
आप्पा की गॅरंटी! मंगळवेढ्याचा चेहरामोहरा बदलणारा जाहीरनामा भाजपकडून प्रसिद्ध.. वाचा सविस्तर; कोणासाठी काय-काय?

आप्पा की गॅरंटी! मंगळवेढ्याचा चेहरामोहरा बदलणारा जाहीरनामा भाजपकडून प्रसिद्ध.. वाचा सविस्तर; कोणासाठी काय-काय?

November 27, 2025
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांची आता खैर नाही! परिवहन विभागाच्या मदतीने कडक धोरणाची अंमलबजावणी; अशी होणार कारवाई शिक्षा

November 27, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..