टीम मंगळवेढा टाईम्स । पतंग उडवताना झालेल्या वादावरून पाचजणांनी मिळून युवकास शिवी गाळ आणि लोखंडी सळईने मारहाण केली.ही घटना २ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास सोशल कॉलेजजवळ घडली.
याप्रकरणी रोमाना जाकीर शेख ( वय २३ , रा.मुस्लिम पाच्छा पेठ ) यांच्या फिर्यादीवरून जेलरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी कि , रोमान शेख यांच्या काकाचा मुलगा पतंग उडवत होता. त्यावेळी त्याचा पतंग कोणतरी तोडला.त्यावेळी त्या मुलाने सोहेल आडते याला पंतग तोडला असे म्हणत जाब विचारला.
याचा राग धरत सोहेल आडते , फरहान आडते , इस्माईल आडते , अफजल आडते ( सर्व रा.मुस्लिम पाच्छा पेठ ) यांच्यासह आणखी एकाने त्या मुलाला मारहाण करून जखमी केले.तपास.पो.ना.म्हेत्रे करत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज