टीम मंगळवेढा टाईम्स।
आवताडे उद्योग समूहातील आवताडे शुगर अँण्ड डिस्टिलरीज प्रा. लि. नंदूर या साखर कारखान्याचा द्वितीय गाळप हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदीपन सोहळा पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते
आज सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी घटस्थापना या शुभमुहूर्तावर कारखाना कार्यस्थळावर संपन्न होणार असल्याची माहिती चेअरमन संजय आवताडे यांनी दिली आहे.
त्याचबरोबर सदर कार्यक्रमाप्रसंगी होम हवन व सत्यनारायण पूजा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
आवताडे शुगरने गतवर्षी प्रथम हंगामामध्ये अतिशय नियोजनबद्ध व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासत यशस्वीपणे प्रथम हंगाम पार पाडला.
अगदी त्याच धर्तीवर आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली यावर्षी सुद्धा यशस्वी गाळपाचा मानस डोळ्यासमोर ठेवून
हा अग्निप्रदीपन सोहळा सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमांसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन संजय अवताडे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज