मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील विदयामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांनी शिपाई अर्जून सोनवले यांना जातीय मानसिकतेतून हजेरी मस्टर सहीसाठी उपलब्ध करुन न दिल्याप्रकरणी
आरोपी मुख्याध्यापक बाबासाहेब धोंडीबा रड्डी, पर्यवेक्षक बाळासाहेब रावसाहेब जुंदळे या दोघाविरुध्द अनुसूचित जाती कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकीकत अशी, यातील फिर्यादी शिपाई अर्जुन सोनवले हे अनुसूचित जाती जमातीचे असून ते लक्ष्मी दहिवडी येथील विदयामंदिर हायस्कूल वर शिपाई या पदावर अनुकंपा तत्वानुसार असून
या पात्र पदावर येण्यापुर्वी वरील आरोपीने फिर्यादीची नेमणूक होवू नये म्हणून आटोकाट प्रयत्न केले होते.
परंतू आंदोलन, उपोषण सारख्या सनदशीर मार्गाचा अवलंब करुन जि.प. शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचेकडील आदेशाने शिपाई पदावर कार्यरत झालो होतो.
वरील आरोपी तेव्हांपासून फिर्यादीवर चिडून होते. दि.१ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २०२२ दरम्यान वरील आरोपींनी संगनमत करुन कर्तव्यावर हजर असताना जातीय मानसिकतेमधून त्रास देण्याच्या उद्देशाने हजरी मस्टर सहीसाठी उपलब्ध करुन दिले नाही,
तसेच या कालावधीत गैरहजर नोंद घेण्यात आली. पर्यवेक्षक आरोपीला गैरहजर बाबत नोटीस बजावण्याचे अधिकार नसताना चुकीच्या पध्दतीने नोटीस पाठविली.
नोकरीस धोका उत्पन्न करण्याच्या उद्देशाने खोटी व खोडसाळ माहिती वरिष्ठ कार्यालयात सादर केली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज