मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क।
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून वारंवार आपले छायाचित्र वापरले जात असून याविरोधात आपण न्यायालयात जाणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
निवडणूक चिन्हासंबंधी शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने स्वतः याबद्दल निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
स्व.प्राचार्य प्रतापराव बोराडे यांच्या श्रद्धांजली सभेसाठी आलेल्या पवारांनी पत्रकारांशी संवाद साधून विविध राजकीय स्थितीवर आपली मते व्यक्त केली.
ते म्हणाले की, निवडणूक चिन्हामुळे आपल्याला काहीच फरक पडत नाही. आजपर्यंत आपण बैलजोडी, गाय-वासरू, चरखा, पंजा आणि घड्याळ आदी चिन्हांवर निवडणुका लढवून विजय संपादन केला.
उद्धवसेना आणि काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याची केवळ चर्चाच राहील. केंद्राने १४ ऑगस्ट फाळणी दिन साजरा करण्यासंबंधी परिपत्रक काढून देशात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याचा इंडिया आघाडी विरोध करत आहे.
‘मागणी करायला काय लागते?’
अजित पवारांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाची शक्ती कमी झाली आहे. म्हणून काँग्रेस अधिक जागा लढवेल, या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याकडे लक्ष वेधले.
त्यावर पवार यांनी ‘मागील लोकसभेत काँग्रेसने किती जागा जिंकल्या? मागणी करायला काय लागते ?’ असा प्रतिप्रश्न केला. मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्याच्या निर्णयाला मी केवळ अनुमोदन दिले होते असेही ते म्हणाले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज