मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
शेतात केलेल्या कामाचे ट्रॅक्टर भाडे का दिले नाही? असे म्हणत एका ३५ वर्षीय आशा वर्कर महिलेस लोखंडी फुकारीने मारुन गंभीर जखमी केल्याप्रकरणी बिराप्पा रामचंद्र रेवे (रा. कर्जाळ) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकीकत अशी, यातील जखमी फिर्यादी दुंडाव्वा शिवाजी पुजारी (रा. कर्जाळ) ह्या मरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा वर्कर म्हणून कार्यरत आहेत. आशा वर्कर कामकाजाबरोबर त्या स्वत:ची शेतीही पाहतात.
शेत मशागतीसाठी त्यांनी ट्रॅक्टर सांगितला होता. दि. १९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता त्या घरी असताना यातील आरोपी बिराप्पा रेवे याने घरासमोर येवून अर्वाच्य भाषेत शिवीगाळी, दमदाटी करत माझ्या ट्रॅक्टरचे भाडे तू अजून का दिले नाही असे म्हणून घरासमोर पडलेली लोखंडी करीत आहेत.
फुकारी घेवून फिर्यादीच्या पाठीत पायावर मारुन गंभीर जखमी करुन फिर्यादीच्या केसाला धरुन ढकलून खाली पाडले, तसेच भांडणाचा आवाज ऐकून फिर्यादीचे वडील गुरुसिध्द,
भाऊ दिगंबर, आई रत्नाबाई व शेजारी तमण्णा तळेकर व इतरांनी येवून भांडणे सोडविली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास बोराळे बिटचे पोलीस हवालदार महेश कोळी हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज