टीम मंगळवेढा टाईम्स ।
मग शेतीमधील खते असो वा बियाणे किंवा याबाबत शासन सातत्याने विविध योजना आहेत किंवा त्यावर अनुदान देत शेतकऱ्यांना एक प्रकारे मदतच करत असतं.
अशातच पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडत आहेत. त्याचबरोबर खरीप हंगाम देखील तोंडावर आलेला आहे.
यामुळे आता शेतकऱ्यांना शेतीमध्ये नांगरट, लागवड यांसारख्या मशागती ट्रॅक्टरद्वारे कराव्या लागणार आहेत.
मात्र, पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला टेकल्यामुळे आता मशागती करण्यासाठी देखील ट्रॅक्टरसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. म्हणूनच आता राज्य सरकारनेच पुढाकार घेत शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि उपयुक्त असा उपक्रम राबवला आहे.
चला तर मग जाणून घेऊयात राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणता उपक्रम राबवला आहे.
शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने आणली ‘ही’ योजना
शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी खर्च परवडत नसल्यामुळे आता राज्य शासनाकडून ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. योजना शेतकऱ्यांसाठी प्रचंड उपयुक्त ठरणार आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना होणारा अधिकचा खर्च वाचणार आहे.
‘या’ शेतकऱ्यांना मिळणारे योजनेचा लाभ
राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ निराधार महिला, विधवा महिला, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला आणि कोरोना काळात पतीचे निधन झालेल्या महिला यांना होणार आहे.
अशा शेतकरी महिलांना पेरणी ते कापणी दरम्यान होणारा खर्च कमी व्हावा यासाठी राज्य शासनाकडून ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे.
त्याचबरोबर ही योजना सर्वप्रथम अकोला जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे. या योजनेबाबत बच्चू कडू यांनी माहिती दिली आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
या संदर्भात बोलताना बच्चू कडू म्हणाले की, शेतकरी कुटुंबात पतीच्या मृत्युनंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह वेळ महिलांवर येते. पण नांगरणी, वखरणी, पंजी आणि पावसाळा सुरू झाल्यावर पेरणीसाठी पैसा आणायचा कुठून? असे अनेक प्रश्न त्यांच्या सामोर उभे असतात. त्यात त्यांना सहाय्य व्हावे यासाठी, हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरु केला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज