टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व जेष्ठ नेते प्रा.लक्ष्मणराव ढोबळे सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोलापूर महापालिकेच्या समोर नार्थकोट मैदान येथे राज्यस्तरीय “शाहू श्री २०२२ ” ही बॉडी बिल्डींग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत अक्षय मोगरकर (मुंबई) याने ‘शाहू श्री’ राज्यस्तरीय बॉडी बिल्डींग स्पर्धेचा किताब पटकावला.
याबरोबरचदुसरा क्रमांक अक्षय सोहत्रे (अहमदनगर), तिसरा क्रमांक रितिक तुषाम (ठाणे) तर बेस्ट पोजर अजिंक्य रेडकर, न्यू अपकमिंग बॉडी बिल्डर विशाल सिंन्हा मान पटकावला.
स्पर्धेची सुरुवात राष्ट्रगीत आणि छ. शिवाजी महाराज, छ. शाहू महाराज, म. जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, माझी पालक मंत्री विजयकुमार देशमुख, अभिजित ढोबळे, अब्राहम आवळे, क्रांतीताई आवळे, कोमलताई साळुंखे, अजय साळुंखे, सिद्राम जावीर, विजय पोटफोडे, रमेश गालफाडे,
अश्विनी चव्हाण, सुरेश पाटोळे, बी.पी. रोंगे, बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष संजय मोरे, श्रीमंत गायकवाड, विशाल गायकवाड, आसिफ यत्नाळ, बालाजी गायकवाड, प्रवीण चव्हाण, राजू कसबे प्रमुख उपस्थिती होती.
करण्यासाठी प्राचार्य डॉ. मीना गायकवाड, प्राचार्य अंबादास पांढरे, प्रा डॉ तानाजी देशमुख, डॉ. मारोती घंटेवाड, डॉ. बापू राऊत,
प्रा. सुहास उघडे, दत्तात्रय पाटील, महादेव म्हमाणे, यश आठवले, प्रमोद काटे, राहूल परीट, नरेंद्र कदम, तसेच शाहू परिवार सर्व सदस्य यांनी परीश्रम घेतले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज