टीम मंगळवेढा टाईम्स ।
एसटी बसला सोलापूर जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. एसटी बस चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. ही बस अक्कलकोटहून कल्लाप्पावाडीकडे जात होती आणि त्याच दरम्यान एसटीला अपघात झाला.
ही बस अक्कलकोट हून कल्लाप्पावाडीकडे जात होती आणि त्याच दरम्यान एसटीला अपघात झाला. एसटी बस रस्त्यावरुन थेट शेजारील शेतात जाऊन पलटली आहे.
सोलापुरात एसटीला अपघात
Posted by News18 Pune on Friday, 20 May 2022
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अक्कलकोट तालुक्यातील कल्लाप्पावाडी जवळ एसटी बस पलटली आहे. या बसमध्ये एकूण 45 ते 50 प्रवासी प्रवास करत होते.
खराब रस्त्यामुळे एसटी बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचं बोललं जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली.
स्थानिकांच्या मदतीने घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये.
तर अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(स्रोत:News 18 लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज