टीम मंगळवेढा टाईम्स।
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के प्रवेशांसाठी ऑनलाइनद्वारे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.सोलापूर जिल्ह्यातून दीड दिवसात ६४७ जणांनी अर्ज केले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील बऱ्याच शाळांनी यंदा आरटीई प्रवेशासाठी नोंदणीच केली नसल्याचे दिसून येत आहे. कारण पोर्टलवर फक्त ३०६ शाळांची नोंद दिसत आहे.
प्राथमिक शिक्षण विभागाकडे जिल्ह्यात २०२२-२३ शैक्षणिक वर्षासाठी एकूण ३२८ शाळांची नोंदणी होईल, असे म्हटले होते. जिल्ह्यातील २० शाळांची नोंदणी झाली नाही.
१६ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. गोंदिया वगळता इतर ठिकाणी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली नव्हती. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
मात्र शुक्रवारपासून सर्वच ठिकाणी टप्प्याटप्प्याने प्रवेश ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे.
राज्यात एकूण ८६१९ शाळांची आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी नोंदणी झाली असून, एकूण ९५ हजार ५८५ प्रवेश क्षमता असेल. तर त्यामध्ये सोलापुरात २२२३ एवढी प्रवेश क्षमता असेल.
पालकांना https://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पालकांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज