टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होणार का नाही याची उत्सुकता सर्वांना होती मात्र बिघाडी झाल्याचे आता चित्र स्पष्ट झाले आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपली असून आज एकूण 14 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
अनिल सावंत यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून भरलेला उमेदवार कायम ठेवल्याने मतदारसंघात आता चौरंगी लढत होणार असल्याचे दिसत आहे.
भाजपकडून समाधान आवताडे, तुतारीकडून अनिल सावंत, मनसे कडून दिलीप धोत्रे व काँग्रेस कडून भगीरथ भालके यांनी आपले अर्ज कायम ठेवल्याने आता यांच्यात थेट लढत होणार आहे.
शेवटपर्यंत मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असे सांगण्यात येत होते. मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची ही जागा असल्याने या जागेवर त्यांनी दावा केला आहे.
अनिल सावंत यांचा उमेदवारी कायम राहिल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी तर झालीच असून मात्र काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचे टेन्शन वाढल्याचे दिसत आहे.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत हेच असल्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सांगण्यात येत आहे.
आज ‘या‘ 14 उमेदवारांनी अर्ज घेतले मागे
वसंतनाना देशमुख, देवानंद गुंड, चंद्रकांत बागल, युवराज गायकवाड, संग्राम ढाणे, मोहम्मद उस्ताद, आप्पासाहेब जाधव, दिनकर शिवाजी देशमुख, शैला अनिल सावंत, सुरज काशीद, आदित्य फत्तेपुरकर, डॉ.संजय भोसले, भालचंद्र कांबळे, यांनी अर्ज मागे घेतले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज