टीम मंगळवेढा टाईम्स।
सध्या राज्यात विधानसभेच्या तयारीचे राजकीय वारे वाहत असतानाच याच धामधुमीत राजकीय श्रीगणेशा करण्याच्या दृष्टीने भैरवनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघात 2500 घरगुती गणपतीचे वाटप करून राजकीय श्रीगणेशा केला.
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात सध्या अनेकजण उमेदवारीसाठी इच्छुक होऊ लागले आहेत.
इच्छुकांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असताना त्यातून आपली राजकीय मोर्चे बांधणी करत असताना त्या त्या उमेदवाराला राजकीय राजश्रय असणे आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून या मतदारसंघात सध्या भाजपकडून विद्यमान आमदार समाधान आवताडे हे दावेदार मानले जात आहेत.
दरम्यान, अनिल सावंत यांनी तुतारी कडून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले असले तरी शरद पवार व जयंत पाटील यांच्या मनातील उमेदवार असल्यामुळे त्यांना मंगळवेढा पंढरपूर विधानसभेची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.
मात्र विधानसभा निवडणुकीचा आखाडा अद्याप जाहीर झाला तरी राजकीय आखाड्याचा मुहूर्त साधण्याच्या दृष्टीने आजपासून सुरू होणाऱ्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी मतदारसंघातील गणेशभक्त तयारीत असतानाच भैरवनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी मतदारसंघातून 2500 गणेश मूर्तीचे वितरण करून आपला राजकीय श्रीगणेशा करण्याचा प्रयत्न केला.
अनिल सावंत हे विद्यमान आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे असून ते यास मतदारसंघातून आमदार होण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यासाठी ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या राजकीय भुवया उंचावल्या.
लवंगी कारखान्यामुळे तालुक्यात ऊस गाळपाबरोबर बेरोजगारांना हाताला काम केल्यामुळे निवडणुकीसाठी त्यांनी यापूर्वी भोसे जिल्हा परिषद गटातून आपला राजकीय गट मजबूत करण्यासाठी अनेक विधायक उपक्रम राबवले.
आता विधानसभेत जाण्याचे मनसुबे असल्यामुळे त्यांनी मतदारसंघात गणेश मूर्तीचे वितरण करून श्री गणेशा केला असला तरी तुतारी मधून श्री गणेशा कधी करणार याची चर्चा मात्र या निमित्ताने मतदारसंघात सुरू झाली आहे.
याप्रसंगी माजी नगरसेवक चंद्रशेखर कोडुभैरी, राहुल सांवजी, शिवसेना शिंदे गट शहरप्रमुख प्रतिक किल्लेदार , मगळवेढा-पंढरपुर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष संतोष रंदवे, सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे माजी अध्यक्ष अनिल मुदगुल, बाळदादा नागणे, मनोज माळी, कृष्णदेव लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश मूर्तीचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक सुत्रसंचलन व आभार भारत मुढे यांनी केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज