टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी अनिल मुदगूल व चंद्रकांत काकडे यांची निवड करण्यात आली आहे.
आठ इच्छुक उभे राहिल्याने मोठा पेच निर्माण झाला होता मात्र मंडळाचे काही माजी अध्यक्ष व ज्येष्ठ लोकांनी यावर तोडगा काढत दोन अध्यक्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आज दि.१५ जानेवारी रोजी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे बैठक संपन्न झाली . यात अध्यक्ष पदी अनिल मुदगूल व चंद्रकांत काकडे ही दोन नावे अध्यक्ष म्हणून काम पाहतील असा निर्णय देण्यात आला.
अध्यक्षपदासाठी आठ जण इच्छुक होते यावर तोडगा काढावा अशी मागणी कार्यकर्त्यांतून होत होती. सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढयाचा शिवजन्मोत्सव सोहळा एक आदर्श शिवजन्मोत्सव म्हणून ओळखला जातो.
मात्र तो यावर्षी दोन अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सर्वसमावेशक, शिस्तबद्ध आणि एकोप्याने साजरा करण्याचे ठरले.
यावेळी नूतन अध्यक्ष अनिल मुदगूल व चंद्रकांत काकडे यांचा मंडळाच्या हस्ते व आमदार समाधान आवताडे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
दरम्यान महाराष्ट्र केसरी उपविजेता पैलवान महेंद्र गायकवाड यांचा अभिनंदनाचा ठराव देखील एकमताने या बैठकीत संमत करण्यात आला.
सदरप्रसंगी जेष्ठ रामभाऊ वाकडे, विष्णुपंत आवताडे, विठ्ठल घुले, विठ्ठल गायकवाड, मारुती वाकडे, दिलीप जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, पक्षनेते अजित जगताप, प्रवीण खवतोडे, चंद्रकांत पडवळे, रामचंद्र दत्तू, मुरलीधर घुले, सचिन शिंदे, राजेंद्र चेळेकर, उद्योजक राहुल ताड, सोमनाथ माळी, सोमनाथ बुरजे, बाळासाहेब निकम, नितीन इंगळे,
सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर कौंडुभैरी, प्रा.विनायक कलुबर्मे, राहुल वाकडे, राहुल सावंजी, उमेश आवताडे, संभाजी घुले, ज्ञानेश्वर कौंडुभैरी, बलवान वाकडे,परमेश्वर पाटील, मधू मुरडे, बबलू सुतार, जमीर इनामदार, शरद गोसडे आदी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज