टीम मंगळवेढा टाईम्स ।
सांगोला रोडवर लेंडवे चिंचाळे हद्दीत असणाऱ्या ज्ञानेश्वरी लॉजवर अवैधरीत्या सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर मंगळवेढा पोलिसांनी छापा टाकला.
यावेळी अवैधरीत्या सुरू असलेल्या प्रकाराचा भंडाफोड करत पीडित महिलेसह एका तरुणाला अटक करण्यात आली.
मंगळवेढा-सांगोला रोडवर ब्रिजच्या उजव्या बाजूला नव्याने झालेल्या ज्ञानेश्वरी लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याबद्दल पोलिस निरीक्षक रणजित माने यांना गोपनीय माहिती मिळाली.
त्यानंतर बनावट ग्राहकास पोलिसांजवळील १२०० पंचांसमक्ष देण्यात आले व त्याचा नंबर नोट करून त्यास योग्य त्या सूचना देऊन पाठविण्यात आले.
पोलिस ठाण्याकडील अधिकारी अंमलदार व पंच असे वाहनाने लेंडवे चिंचाळे येथील ब्रिजच्या पुलाच्या खाली आडोशाला जाऊन थांबले व थोड्याच वेळात बनावट ग्राहकाचा संकेत असल्याने
सर्व महिला व पुरुष अधिकारी अंमलदार यांनी छापा टाकला असता एक पीडित मुलगी, बनावट ग्राहक व लॉजचे मालक सापडले.
त्यावेळी त्याची झडती घेतली असता पोलिसांनी बनावट ग्राहकास दिलेले पैसे आरोपी अविनाश विष्णु येडगे याच्याजवळ आढळले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रणजित माने करीत आहेत.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, डीवायएसपी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रणजित माने,
सपोनि सत्यजित आवटे, पुरुषोत्तम धापटे, सलीम शेख, अशोक बाबर, अविनाश पाटील, हजरत पठाण, दत्ता येलपले, राजू आवटे, प्रवीण सावंत, कदम, सुनीता चवरे, अंजना आटपाडकर यांनी केली.
दरम्यान सोलापूर रोड वरती असलेल्या एका पत्राच्या खोक्यात राजरोसपणे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. यावरही कारवाई करावी अशी मागणी देखील आता पुढे येऊ लागली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज