पंढरपूर : राजेंद्र फुगारे
बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दि.१९ फेब्रुवारी रोजी सबंध महाराष्ट्रात साजरी केली जात आहे. ही जयंती सर्वच जण घरोघरी साजरी करतात.
शिवछत्रपतींचा इतिहास अबाल वृद्धांना कळावा यासाठी पंढरीत छत्रपतींच्या कार्यावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विठ्ठल प्रतिष्ठानकडून हा कार्यक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली आहे.
उद्यापासून पंढरीत या व्याख्यानमालेस शुभारंभ होत आहे. ही व्याख्यानमाला तीन दिवसीय असून, सायंकाळी ७ ते ९ या काळात ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.
पंढरपूर मधील शिवाजी महाराज चौक म्हणजेच शिवतीर्थ या ठिकाणी दि. १६ फेब्रुवारी रोजी डॉ. शिवरत्न शेटे, १७ फेब्रुवारी रोजी शिवश्री यशवंत गोसावी आणि १८ फेब्रुवारी रोजी शिवश्री श्रीमंत कोकाटे यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.
या व्याख्यानांमधून शिवाजी महाराजांच्या जीवन पटलाचा इतिहास तळागाळापर्यंत पोहोचणार आहे. या व्याख्यानमालेचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा असे आवाहन अभिजीत पाटील यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज