टीम मंगळवेढा टाईम्स ।
सामाईक विहिरीतील पाणी भरायचे नाही असे म्हणून चिडलेल्या भावाने सख्ख्या भावासह त्यांच्या पत्नीला शिवीगाळ दमदाटी करत मारहाण केली.
ही घटना सायंकाळी ५ च्या सुमारास शिवणे ता. सांगोला येथे घडली. याबाबत बापू आनंद जाधव यांनी भाऊ अंकुश आनंद जाधव याचे विरुद्ध फिर्याद दिली आहे.
फिर्यादि बापु जाधव यांची पत्नी सुनीता ही शनिवार १ जून रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास जनावरांना पाणी पाजण्यासाठी सामाईक विहिरीवरील मोटर चालू करून बॅरेल भरत होती.
त्यावेळी फिर्यादीचा भाऊ अंकुश जाधव याने तेथे येऊन ही विहीर माझी असून, या विहिरीवर पाणी भरायचे नाही असे म्हणून फिर्यादीची पत्नी सुनीता हीस शिवीगाळ करून ढकलून दिले.
त्यावेळी फिर्यादीने भाऊ संकश यास शिवीगाळ का करतो म्हणून विचारले असता त्याने तुम्ही येथे राहायचे नाही, ही विहीर माझी आहे, या विहिरीचे पाणी तुम्ही भरायचे नाही असे म्हणून त्याच्या नरड्याला धरून बोचकारले.
शिवीगाळ दमदाटी करत हाताने मारहाण करून ढकलून दिले व तेथेच पडलेला दगड हातात घेऊन फिर्यादीच्या डाव्या डोळ्याच्या खालच्या बाजूला मारला व जिवे ठार मारण्याची धमकी देऊन तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज