टीम मंगळवेढा टाईम्स ।
दसरा व दिवाळी या सणासुदीच्या काळात अन्न व औषध प्रशासन विभाग सज्ज झाला असून मिठाईच्या दुकानांबरोबरच किरणा दुकानांमधील मालांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अन्ना व औषध विभागाचे सहायक आयुक्त सुनील जिंतुरकर यांनी दिली.
दिवाळी व दसऱ्याच्या कालाधवीत मोठ्या प्रमाणात मिठाईची खरेदी केली जाते. याबरोबरच घरी फराळाचे पदार्थ तयार करण्यासाठी पोहे, रवा, बेसन, खाद्यतेल, साखर, सुकामेवा, खसखस या पदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते.
अनेक वेळा भेसळयुक्त पदार्थांची विक्री बाजारात केली जाते. या पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने सावध पवित्रा घेतला आहे.
नवरात्र काळात अन्न व औषध विभागाच्यावतीने अनेक मिठाई दुकानांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. तसेच भगर व उपाससच्या पदार्थांचे नमुणे घेण्यात आले होते.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवरख सोलापूर शहर व जिल्ह्यात येणाऱ्या खावा व मिठाईच्या पदार्थांची तपासणी करण्यात येत आहे. त्याबरोबर मॉल, होलसेल किराणा व्यापारी व किराकोळ दुकानांमधील किराणा मालांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत.
ग्राहकांना कोणत्याही खाद्यपदार्थांबद्दल शंका आल्यास त्वरीत अन्न व औषध विभागाची संपर्क करावा, असे आवाहन सहायक आयुक्त सुनील जिंतुरकर यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज