mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

चांगली बातमी : सोलापूरच्या ग्रामीण भागातील सर्व दुकाने ‘या’ वेळेत आजपासून सुरु करण्यास परवानगी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
चांगली बातमी : सोलापूरच्या ग्रामीण भागातील सर्व दुकाने ‘या’ वेळेत आजपासून सुरु करण्यास परवानगी


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या आदेशामुळे सोलापूर जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय ठप्प झाले होते. बंद असलेल्या अनेक उद्योग व व्यवसायांना आजपासून (शुक्रवार) सवलत देण्यात आली आहे.


याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी 20 मे रोजी घेतला असून 22 मे ते पुढील आदेश होईपर्यंत हा सुधारित आदेश लागू असणार आहे. या आदेशामुळे ग्रामीण भागातील व बिगर प्रतिबंधीत क्षेत्रातील क्रीडा, संकुल, स्टेडियम तसेच इतर सार्वजनिक मोकळ्या जागा या वैयक्तिक, सर्वासाठी खुल्या असणार आहेत.

प्रेक्षक, सांघिक क्रीडा प्रकार करण्यास मनाई असणार आहे. सर्व शारीरिक व्यायाम इतर उपक्रम सोशल डिस्टन्स पाळून करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सर्व प्रकारची सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली असून तीन चाकी वाहन एक अधिक दोन व्यक्तींसाठी आणि चार चाकी वाहन एक अधिक दोन व्यक्ती या अटीवर परवानगी देण्यात आली आहे.


मंगळवेढ्यातील दुकाने सुचनांसह उघडण्यास परवानगी


जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार 22 मे 2020 पासून मंगळवेढयातील सर्व दुकाने सुधारित सुचनांसह उघडण्यास परवानगी देण्यात आली असून सर्वांनी शासन आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन मंगळवेढा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केले आहे.

पाटील म्हणाल्या, सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये परवानगी देण्यात आलेल्या उपक्रमामध्ये जीवनावश्यक वस्तूसह यापुर्वी परवानगी दिलेले सर्व उद्योग सकाळी 9.00 ते 5.00 वाजेपर्यंत सुरु राहतील तसेच नविन सुधारीत आदेशानुसार केश कर्तनालयास परवानगी देण्यात आली असून हॉटेल व्यवसायिकांना पार्सल देण्यास परवानगी देण्यात आली आहे.

   

सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक करणार्‍यांसाठी दुचाकीवर केवळ एक चालक,तीन चाकी वाहनांमध्ये एक अधिक दोन,तर चाकी वाहनांमध्ये एक अधिक दोन अशा स्वरूपाची परवानगी देण्यात आली असून सर्व मार्केट व दुकाने ही सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत उघडी राहतील परंतू कोणत्याही प्रकारचे सुरक्षित अंतर  न पाळल्यास किंवा गर्दी केल्यास शासकीय यंत्रणेकडून असे उद्योग व्यवसाय बंद करण्यात येतील.

 

अत्यावश्यक कामासाठी सकाळी 7.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेतच नागरिकांना घराच्या बाहेर पडता येईल अन्यथा संचारबंदी लागू असेल. कोरोनाचा प्रसार लवकर ओळखण्यासाठी व संसर्गाचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही पल्लवी पाटील यांनी सांगितले.


—————

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
खळबळजनक : भीमा नदीत अज्ञात सात वर्षीय मुलीचे प्रेत आढळले

खळबळजनक : भीमा नदीत अज्ञात सात वर्षीय मुलीचे प्रेत आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

शेतात पाणी पोहोचेपर्यंत संघर्ष; चळवळीचा लढा थांबणार नाही; मंगळवेढ्यातील पाणी परिषदेत संघर्ष समितीचे शिवाजीराव काळुंगे यांनी दिला नारा

June 27, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिला शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! जमीन नसतानाही शासकीय योजनांचा लाभ मिळणार

June 27, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; ‘या’ एका कागदपत्राची सक्ती कायमची रद्द; लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

June 27, 2026
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

न्यायालयीन लढा, सारथीच्या योजना अन् कुणबी दाखले; ‘मराठा आरक्षण कक्ष’ सांभाळणार ही ५ महत्त्वाची कामे; सरकारचे मोठे पाऊल; मंत्रालयात स्वतंत्र कक्षाची स्थापना

June 26, 2026
मर्चंट नेव्हीतील अधिकार्‍यावर हल्ला; माजी सरपंचासह 5 जणांना पोलिस कोठडी

भक्तांना मोठा धक्का! करणी-बाधा उतरवणारा मंगळवेढ्यातील ‘बिरा महाराज’ निघाला गांजा तस्कर; एनडीपीएस कायद्यान्वये पोलिसांची मोठी कारवाई

June 26, 2026
मंगळवेढ्यात भव्य ओपन जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचा थरार; ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना मिळणार हक्काचे व्यासपीठ; साप्ताहिक रणयुग टाईम्सचा पुढाकार

मंगळवेढ्यात भव्य ओपन जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचा थरार; ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना मिळणार हक्काचे व्यासपीठ; साप्ताहिक रणयुग टाईम्सचा पुढाकार

June 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा