mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

किडनी संबंधित सर्व उपचार आता मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध; वेळीच लक्षणे ओळखा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 28, 2022
in आरोग्य, मंगळवेढा, सोलापूर
नागरिकांनो! महिला हॉस्पिटल & मल्टीस्पेशालिटी येथे आजपासून मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन

टीम मंगळवेढा टाईम्स ।

किडनीविकार हा बर्‍याचदा त्याच्या अंतिम स्तरात पोहचल्यावरच त्याची लक्षणं दिसून येतात. म्हणूनच योग्य वेळी लक्षण जाणा आणि धोका टाळा असे आवाहन मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील किडनी तज्ञ डॉक्टरांनी केले आहे.

किडनीचे विकार हे ‘सायलंट किलर’ असल्याने बर्‍याचदा अंतिम टप्प्यांत आल्यानंतरच ते रुग्णांच्या लक्षात येतात.

मात्र तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली असल्याने अनेकदा किडनीचे विकार जीवावर बेतू शकतात. त्यामुळे वेळोवेळी आपले शरिर आपल्याला देत असलेले संकेत जाणा म्हणजे किडनी विकारावर योग्य उपचार करणे शक्य होईल.

किडनी हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. युरिया, क्रिएटिनिन, ऍसिड यांसारख्या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांपासून रक्त फिल्टर करण्यासाठी हे प्रामुख्याने जबाबदार आहे. हे सर्व विषारी पदार्थ आपल्या मूत्राशयात जातात आणि लघवी करताना बाहेर पडतात.

किडनी फेल्युअरची लक्षणे इतकी सौम्य असतात की हा आजार वाढत नाही तोपर्यंत बहुतेक लोकांना काही फरक जाणवत नाही. अनेक महिला कामाच्या गडबडीत पाणी कमी पितात.  तर कधी बराचवेळ लघवी थांबवून ठेवावी लागते यामुळे मुत्राशयाच्या आजारांचा धोका वाढू शकतो.

किडनी विकाराची ही आहेत काही लक्षणे

किडनीचा शेवटच्या टप्प्यात जाण्यापूर्वी प्रत्येक रुग्णांमध्ये काही बदल आढळतात. ही लक्षणे आढळल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास, किडनी फेल हे टाळता येते.

त्यांचे लक्षणे लघवीचा लालसर रंग, हात पाय, तोंडावर येणारी सूज, थकवा येणे, रक्तदाब वाढणे, भूक मंदावणे, उलटी मळमळ होणे, दम लागणे, अंगावरती खाज येणे, हिमोग्लोबिन कमी होणे, लघवी मध्ये फेस तयार होणे, हे किडनी बिघडल्याचे लक्षण आहे.

याकडे दुर्लक्ष केले, किंवा घरगुती पद्धतीचे उपचार करून तज्ञ डॉक्टरांच्या कडे जाणे टाळले तर किडनीला हानी पोहोचू शकते.

🔴 बालकांमध्येही किडनीचे विकार

गेल्या काही वर्षापासून हातपंपाचे पाणी व जंक फूड चे वाढते प्रमाण त्यामुळे बालकांमध्ये किडनीचे विकार मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.

🔴 आता हिमोडायलेसेस करण्याची सोय आता मंगळवेढा तालुक्यातील मंगळवेढा मल्टीस्पेशल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाली आहे त्यामुळे बालकांना हे उपचार नवसंजीवनी देणारे ठरणार आहे

🔴 लहान मुलांचा लघवीचा बदललेला रंग आणि हातपायंसह चेहऱ्यावर आलेली सूज हे किडनी बिघडल्याचे महत्वपूर्ण लक्षण मानले जाते.
किडनी विकार वाढीची कारणे

किडनीचा आजार हा काही वेळा अनुवंशिक असतो. तर तो काही वेळा चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम ही असतो. गेल्या काही वर्षात किडनी रुग्ण वाढण्याचे कारण वेदनानाशक औषधांचे अति सेवन असल्याचे समोर आले आहे.

वेदनानाशक औषधांमध्ये असणारी प्रतिजैविके त्रासदायक असतात. त्यामुळे पॅरासिटॅमॉल घेण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. याबरोबरच वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे.

किडनी हा शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. या अवयवाची निगा राखणे व त्याच्या आजाराची लक्षणे जाणून घेऊन तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. परस्पर कोणतेही औषध घेणे टाळावे. वर्षातून एकदा रक्तदाब व रक्तातील साखर तपासणी अत्यावश्यक आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 26, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

September 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

माझ्या मुलीला का नांदवत नाही?’ जावयाला रस्त्यावर पाडून दगडाने ठेचले; सासऱ्याचा मंगळवेढ्यात थरारक राडा; सासू, सासरे आणि पत्नीवर पोलीस कारवाई

September 25, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! काळ्या आईची सेवा करतानाच काळाची झडप; मंगळवेढ्यात सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

September 24, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
Next Post
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी पहिल्या दिवशी दाखल झाले ‘एवढे’ अर्ज; बावीस इच्छुकांनी घेतले 24 उमेदवारी अर्ज

मोठी बातमी! राज्यात लवकरच सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजणार; स्थगितीबाबत आला महत्त्वाचा आदेश

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 26, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

September 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..