समाधान फुगारे ।
केंद्र सरकारने आयुर्वेदाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियांची परवानगी दिल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज 11 डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी बंद पुकारला आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनने आज ११ डिसेंबर रोजी डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय पातळीवर बंद पुकारला असून या बंदमध्ये सहभागी होवून पाठींबा दर्शविण्यासाठी मंगळवेढा आयएमएने देखील बंद पाळण्याचे ठरविले आहे.
सदर दिवशी मंगळवेढा शहर व तालुक्यातील सर्व दवाखाने, क्लिनिक व ओपीडीच्या सेवा सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्यात येणार असून तातडीच्या सेवा मात्र सुरु राहणार असल्याचे मंगळवेढा शाखेच्यावतीने कळविण्यात आले आहे.
याबाबत मंगळवेढा तहसीलदांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सदर प्रसंगी अध्यक्ष डॉ.मधुकर कुंभारे, सेक्रेटरी डॉ.सुरेश होनमाने, उपाध्यक्ष डॉ. श्रीनिवास कोरुलकर, खजिनदार डॉ.शरद शिर्के,सदस्य डॉ.सुरेश काटकर, डॉ.प्रविण सारडा,डॉ.अस्लम मुलाणी,डॉ.विवेक निकम, डॉ.संदेश पडवळ,डॉ.लक्ष्मीकांत मर्दा, डॉ.नंदकुमार शिंदे, डॉ.पुष्पांजली शिंदे, डॉ.दत्तात्रय घोडके, डॉ.आसावरी घोडके, डॉ.विजय नडगिरी आदी उपस्थित होते.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9970 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9970 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज