mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महाराष्ट्रात आजपासून काय काय बदलणार? दोन वर्षांनंतर कोरोनाच्या नियमांपासून सुटका

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 1, 2022
in राज्य
नागरिकांनो! सोलापूर जिल्ह्यात आजपासून विना मास्कचे फिरताना आढळल्यास थेट गुन्हे दाखल होणार

टीम मंगळवेढा टाईम्स। 

आजपासून महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना तब्बल दोन वर्षांनंतर कोरोना निर्बंधपासन मुक्तता मिळणार आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने मोठी घट पाहायला मिळत आहे.

अनेक जिल्ह्यामध्ये तर एकही कोरोना रुग्ण आढळत नाही. त्यातच सक्रिय रुग्णसंख्या एक हजाराच्या खाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यातील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आज एक एप्रिलपासून आता राज्यात कोरोनाचे निर्बंध नसतील.

महत्त्वाची बाब म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रा आणि मिरवणुका काढण्यासाठीही परवानगी देण्यात आली आहे.

मास्क आणि निर्बंधांची सक्ती नसली तरी, कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. याबाबतीतले सविस्तर आदेश तातडीने देण्याचे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले.

कोरोना निर्बंध हटवले तरी मास्कचा वापर नागरिकांनी करावा यासाठी राज्य सरकारकडून सातत्याने आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात आजपासून काय काय बदलणार?

1 एप्रिलपासून महाराष्ट्रात करोनाचे सर्व निर्बंध हटतील..मार्च 2020 ते 31 मार्च 2022 जवळपास दोन वर्षे लागू असलेले कोरोनाचे निर्बंध संपुष्टात येतील

गुढीपाडवा शोभायात्रा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान उत्साह साजरा करता येणार

केंद्राच्या निर्णयानुसार मास्कसक्ती आणि सोशल डिस्टन्सिंग कायम असेल..मात्र महाराष्ट्राच्या निर्णयानुसार मास्कसक्ती नसेल, मास्क लावणे ऐच्छिक असेल

हॉटेल, उद्याने, जीम, सिनेमागृह, शैक्षणिक संस्थामधील उपस्थिवर मर्यादा नाही..लग्न किंवा कौटुंबीक कार्यक्रम, सोहळे, अंत्ययात्रांमधील उपस्थितींवर मर्यादा नाही.

बस, लोकल आणि रेल्वेने प्रवास करताना लशीचं प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही.

सार्वजनिक ठिकाणं, मॉल, बगिचे याठिकाणी मास्क वापरणे किंवा लशीचं प्रमाणपत्र धाखवण्याची गरज भासणार नाही.

महारष्ट्रभरात सर्वधर्मीयांचे सर्व उत्सव निर्बंधमुक्त असतील, यात्रा-जत्रा धुमधडाक्यात होणार

निर्बंधामुळे उद्योग आणि व्यवसायांवर आलेली बंधनं हटली आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळेल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: महाराष्ट्र

संबंधित बातम्या

मोठी बातमी! स्फोटक रसायनाचा टँकर मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर झाला पलटी; सोलापूरकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली; आता वाहतूक सुरळीत सुरू

मोठी बातमी! स्फोटक रसायनाचा टँकर मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर झाला पलटी; सोलापूरकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली; आता वाहतूक सुरळीत सुरू

August 10, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिलांनो! अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींना विचारणार ‘हे’ ५ प्रश्न; पडताळणीला सुरुवात, तुमचं नाव तर नाही ना?

August 10, 2025
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

कामाची बातमी! अकाऊंट होल्डरचा मृत्यू, नॉमिनीला ‘इतक्या’ दिवसांच्या आत पैसे मिळणार; जाणून घ्या RBI चे नवीन नियम

August 10, 2025
कत्तलखान्याकडे जाणारी ३१ जनावरे पकडली; मंगळवेढ्यातील दोघांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल

पिसाळलेला कुत्रा म्हशीला चावला, कोण मेलं असेल? अन् महाराष्ट्रातील ‘या’ गावावर रेबीजचं इंजेक्शन घेण्यासाठी लोकांनी का केलीय गर्दी?

August 9, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! एकही रुपया खर्च न करता मिळणार वर्षाला 36 हजार पेन्शन; कुठे कराल नोंदणी? कोणते शेतकरी ‘या’ योजनेसाठी पात्र आहेत?

August 7, 2025
शाळांची वेळ ठरविण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना; दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

मराठी शाळेसोबतचं आता सर्व माध्यमांच्या शाळेसाठी आता मोठा निर्णय; राष्ट्रगीतानंतर ‘हे’ गाणं बंधनकारक करण्यात आलं

August 7, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

तयारीला लागा! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली; निवडणूक आयोगाने दिली महत्वाची माहिती

August 6, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडिलांनी नवा मोबाईल न दिल्याने 16 वर्षीय मुलानं उचललं टोकाचं पाऊल; तातडीने रुग्णालयात नेलं पण…मोबाईलच्या व्यसनासंदर्भात सावध राहण्याची गरज

August 5, 2025
मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, विशेष अधिवेशनापूर्वी महत्वाची घडामोड; किती टक्के आरक्षण मिळणार?

खळबळ! एकनाथ शिंदे कर्णासारखे दानशूर, 40 वर्षाच्या राजकीय जीवनात असा माणूस पाहिला नाही; शरद पवारांचा आमदार शिंदेंच्या प्रेमात

August 5, 2025
Next Post
अभिमानास्पद! देवमाणूस प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचा ‘या’ संस्थेने ‘शिक्षण व सहकाररत्न’ पुरस्कार देऊन केले सन्मानित

अभिमानास्पद! देवमाणूस प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचा 'या' संस्थेने 'शिक्षण व सहकाररत्न' पुरस्कार देऊन केले सन्मानित

ताज्या बातम्या

मोठी बातमी! स्फोटक रसायनाचा टँकर मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर झाला पलटी; सोलापूरकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली; आता वाहतूक सुरळीत सुरू

मोठी बातमी! स्फोटक रसायनाचा टँकर मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर झाला पलटी; सोलापूरकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली; आता वाहतूक सुरळीत सुरू

August 10, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिलांनो! अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींना विचारणार ‘हे’ ५ प्रश्न; पडताळणीला सुरुवात, तुमचं नाव तर नाही ना?

August 10, 2025
मंगळवेढा शहराच्या वैभवात भर! ‘हॉटेल रानवारा’ फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंट’ उद्यापासुन नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज होणार

मंगळवेढा शहराच्या वैभवात भर! ‘हॉटेल रानवारा’ फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंट’ उद्यापासुन नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज होणार

August 10, 2025
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

नागरिकांनो! तुमच्या घरात बसवा ‘हे’ उपकरण, शॉक लागूनही होणार नाही कोणाचा मृत्यू; सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जणांचा करंट लागून गेला जीव

August 10, 2025
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

कामाची बातमी! अकाऊंट होल्डरचा मृत्यू, नॉमिनीला ‘इतक्या’ दिवसांच्या आत पैसे मिळणार; जाणून घ्या RBI चे नवीन नियम

August 10, 2025
मंगळवेढेकरांनो! प्रोफेशनल स्टाफ, A to Z हेअर स्टाईल माफक दरात, ‘हेअर मास्टर सलून’ आजपासून आपल्या सेवेत; सर्व सुविधा एकाच छताखाली; हेड शाम्पूवॉश मोफत

मंगळवेढेकरांनो! प्रोफेशनल स्टाफ, A to Z हेअर स्टाईल माफक दरात, ‘हेअर मास्टर सलून’ आजपासून आपल्या सेवेत; सर्व सुविधा एकाच छताखाली; हेड शाम्पूवॉश मोफत

August 10, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..