टीम मंगळवेढा टाइम्स । सोलापूरात गेल्या तीन महिन्यांपासून वाईन शॉप बंद असल्याने तणावाखाली असलेल्या मद्यप्रेमी सोलापूरकरांचा प्रश्न अखेर सुटला आहे. येत्या शनिवारपासून घरपोच वाईन मिळणार आहे. या संदर्भातील आदेश गुरुवारी रात्री जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढला आहे.
घरपोच वाईन देणार्यांनी कोरोनाच्या अनुषंगाने सर्व प्रकारची खबरदारी घेणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या नियमांचे पालन करून वाईन उपलब्ध करून देण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
वाईन हवी असल्यास व्हाट्सॲप, एसएमएस आणि दूरध्वनीचा वापर करून ऑर्डर करता येणार आहे. ऑर्डरप्रमाणे घरपोच सेवा देण्यासाठी वाईन शॉप चालकांनी स्वतःची वितरण व्यवस्था करावी लागेल. ही सेवा फक्त पासधारकांना उपलब्ध असणार आहे. जर कोणाकडे पास नसेल तर तो पास राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातून मिळणार आहे.
घरपोच सेवा देणाऱ्या वाईन शॉप चालकांनी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू नये असे आदेशात म्हटले आहे. घरपोच सेवा देणाऱ्या डिलिव्हरी बॉयची वैद्यकीय तपासणी करून त्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागणार आहे. मास्क, हेड कॅप आणि हॅण्ड ग्लोज वापरणे बंधनकारक आहे.
————————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज