mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आमदार भालकेंच्या निधनानंतर आरोग्याबाबतची समस्या ऐरणीवर, कोरोनामुक्तीनंतरही आरोग्याकडे दुर्लक्ष नकोच

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 30, 2020
in आरोग्य
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

कोरोनानंतर झालेल्या आरोग्यविषयक गुंतागुंतीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पंढरपूर-मंगळवेढा येथील आमदार भारत भालके यांचे शनिवारी निधन झाले.

भालके यांच्या निधनानंतर कोरोनांतरच्या आरोग्याबाबतचा मुद्दा ऐरणीवर आला असून, कोरोनानंतर उद्भवणाऱ्या समस्यांवर दुर्लक्ष करणे महागात पडू शकते, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

अशाच प्रकारे उच्च रक्तदाब असलेल्या मुंबईतील एका 58 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाल्याने रूग्णालयात दाखल केले होते.प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

या रूग्णाला टॉसिलीझुमब, कॉन्व्हल्सेन्ट प्लाझ्मा आणि अँटीवायरल थेरपीच्या स्वरूपात इम्युनोसप्रेशन औषधोपचार केले होते. त्यानंतर त्रास जाणवत असल्याने वैद्यकीय चाचणीत या रूग्णाचे रक्त गोठत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रूग्णाला रक्त पातळ करण्यासाठी इंजेक्‍शन देण्यात आले.

साधारणतः 60 दिवस अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. चालण्यास अडचण येत असल्याने त्यांना फिजिओथेरपी देण्यात आली. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर रूग्णाला घरी सोडण्यात आले. कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांमध्येही काही महिन्यांनंतर थकवा जाणवणे, खोकला, सर्दी, श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी दिसून येत आहेत.

त्यामुळे फुफ्फुसातील फायब्रोसिसची लक्षणे दिसल्यास त्वरीत उपचार घेणे गरजेचे आहे. 50 पेक्षा जास्त वयोमान असलेल्या आणि श्‍वसनाचे विकार असणाऱ्या रूग्णांना यामुळे अधिक त्रास होऊ शकतो.

फुफ्फुसातील फायब्रोसिस असणाऱ्या रुग्णाला दर दोन महिन्यांनी वैद्यकीय तपासणी करणे आवश्‍यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

कोरोनानंतर तीन महिने काळजीचे

कोरोनातून बरे झाल्यानंतर किमान दोन ते तीन महिने काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनामुळे श्‍वसन प्रक्रिया, फुप्फुस, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे प्रसंगी हृदयविकाराचा झटकाही येण्याची शक्‍यता असते.

त्यामुळे जोपर्यंत लस येत नाही आणि कोरोना नियंत्रणात येत नाही तोपर्यंत काळजी घेणे गरजेचे आहे, असे टास्क फोर्स समितीचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.(स्रोत : सकाळ)

कोरोनामुक्त झालेल्या 15 टक्के रुग्णांमध्ये पोस्ट कोव्हिडची लक्षणे दिसून येत आहे. त्यांना थकवा जाणवणे, फुफ्फुसाचा फायब्रोसिस झाल्याच्या तक्रारी आहेत.

मधुमेह, उच्च रक्तदाब, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्‍टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी), दमा आणि लठ्ठपणा असणाऱ्या लोकांना अधिक त्रास होऊ शकतो. प्रसंगी हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतरही आरोग्याकडे दुर्लक्ष करू नयेत.– डॉ. कुंदन मेहता, पल्मोनोलॉजिस्ट.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार भारत भालकेकोरोना टेस्ट

संबंधित बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 22, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

चिंताजनक! राज्यात ‘या’ रोगाचा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन; लक्षणे आणि उपचार?

September 5, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

तळणीनंतर खाद्यतेल पुन्हा वापरणारांनो सावधान! खाद्य तेलाबद्दल तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, ‘हा’ नियम न पाळल्यास 7 वर्षापर्यंत शिक्षा; विक्रेत्यांना गंभीर इशारा

August 21, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

धक्कादायक! सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज

August 19, 2026
ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

August 6, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026
Next Post

स्वराज्य कॅफे मंगळवेढेकरांच्या सेवेसाठी सज्ज, आज उद्घाटन शुभारंभ

ताज्या बातम्या

शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा