मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।
आमचे विरोधात पोलिस स्टेशनला गुन्हा का दाखल केला असे म्हणत एका २३ वर्षीय विवाहितेच्या अंगावरील ब्लाऊज फाडून तीच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी
तुकाराम पांडुरंग कोळी, गोट्या उर्फ अशोक तुकाराम कोळी (रा. इंगळे गल्ली, मंगळवेढा) या दोघाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील २३ वर्षीय महिला फिर्यादीने दि. २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वा. शहरातील इंगळे गल्लीत शेजारी राहणारे चुलत दिर तथा आरोपी गोटया तुकाराम कोळी यास घरासमोर गाडी लावू नको असे म्हणाल्याने
त्याने हाताने मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी त्याच्याविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर फिर्यादीस मारहाण फिर्यादी व तीचे पती, फिर्यादीची बहिण रात्री ९.३० च्या सुमारास घरी गेल्यावर फिर्यादीचे चुलत सासरे तथा आरोपी तुकाराम कोळी व गोटया उर्फ अशोक कोळी यांनी दारू पिवून आले
व आमचे विरोधात पोलिस स्टेशनला गुन्हा का दाखल केला असे म्हणून आरोपीने करीत असताना फिर्यादीच्या अंगावरील ब्लाऊज फाडून फिर्यादीच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले.
तसेच फिर्यादीचे पती व दिर अनिल हे सोडविण्यास आले असता त्यांना हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण केली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज