टीम मंगळवेढा टाईम्स।
राजकीय वैमनस्यातून लोखंडी रॉडने व फायटरने मारुन जखमी केल्या प्रकरणातून माजी सरपंचासह तिघांची भा.द.वि. कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ या गुन्हयातून मंगळवेढा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.एम. देवर्षी यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.
सदर प्रकरणातील हकीकत अशी की, मौजे कात्राळ येथील ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर आरोपी फटाकडया उडवीत होते. त्यांना आमचे घरासमोर फटाक्या उडवू नका असे म्हणाल्याचा राग मनात धरुन आरोपीनी लोखंडी रॉडने व फायटरने मारुन जखमी केले.
अशी फिर्याद कात्राळचे माजी सरपंच विजय माने, राजकुमार माने, प्रकाश माने, दुंडाप्पा माने यांचे विरोधात दाखल करण्यात आली होती. सदर फिर्यादीचे अनुषंगाने सरकार पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले होते.
सदर प्रकरणी विजय माने हे लोकप्रिय सरपंच असून त्यांचे गावामध्ये बऱ्याच वर्षापासून राजकीय वर्चस्व असून त्यांचे कालावधीमध्ये गावामध्ये कोणत्याही प्रकारची भांडणे अथवा तक्रारी दाखल झालेल्या नाहीत.
सदर गावाला त्यांचे कालावधीमध्ये तंटामुक्ती विशेष पुरस्कार मिळालेला होता. त्यानंतर देखील निवडणूकीत त्यांचीच पार्टी निवडून आल्याने मोटार सायकलवरुन घसरुन पडल्याने झालेल्या जखमांचा गैरफायदा घेवून आरोपीविरुध्द खोटी फिर्याद दाखल करण्यात आली होती.
असा अॅड. एम. डी. गायकवाड यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन मंगळवेढा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. एम. देवर्षी यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. यात सरकार पक्षातर्फे अॅड.आर.एल.बामणे व आरोपीतर्फे अॅड. एम.डी. गायकवाड यांनी काम पाहिले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज