टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्रात मागील २-३ दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे. तब्बल महिनाभर रुसलेला पाऊस सप्टेंबर महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी दाखल दाखल झालं. माना टाकलेल्या पिकांची नव्याने डोलायला सुरुवात केली आहे.
मागील महिना कोरडा गेल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे काही दिलासा मिळाला आहे. मात्र राज्यात काही ठिकाणी शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
हवामान विभागच्या अंदाजानुसार आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. सहा जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
मुंबईत आज पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा या सहा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे, सातारा, सोलापूर येथील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या ठिकाणी काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात सक्रीय झालेला पाऊस पुढील २-३ आठवडे कायम राहिल असा अंदाज पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांना वर्तवला आहे. त्यामुळे राज्यातील रबी पिकाला नवी संजिवनी मिळाली आहे. शेतकऱ्यांना रबी हंगाम वाया जाण्याचा धोका टळू शकतो.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज