टीम मंगळवेढा टाईम्स ।
आजीच्या अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या नातू व अन्य एकाचा विसर्जन करण्याआधीच अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असल्याने मंगळवेढा तालुक्यात खळबळ माजली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नंदेश्वर येथील भामाबाई दाजी मेटकरी या महिलेचे गुरुवार दि.22 जुलै रोजी निधन झाले होते.
या महिलेच्या तिसऱ्या दिवसाचा विधी उरकल्यानंतर नातू अरविन ज्ञानू मेटकरी व भाचा बंडू पांडुरंग गोरे हे दोघेजण दुचाकीवर बेगमपूर येथील भीमा नदीत अस्थी विसर्जनासाठी चालले होते.
पण विसर्जन करण्याआधीच मंगळवेढा शहरापासून साधारणपणे दोन किलोमीटरवर समोरून येणाऱ्या टेम्पोने धडक दिल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
या घटनेने नंदेश्वर गावावर शोककळा पसरली आहे. टेम्पो ड्रायव्हरच्या चुकीमुळे अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यावरून मिळत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज