मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मोतीवाला गोडावून समोरील दुभाजक ओलांडत असताना दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी दोन वाजता मोतीवाला गोडावून येथे घडली.
दुचाकीस्वार ओंकार अविनाश घोडके (वय २३, रा. एल ३, स्नेह संवाद नगर, जुळे सोलापूर) याच्या विरोधात विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
मृत इम्रान अकबर चाऊस (वय ४०) हे दुभाजक ओलांडून जात असताना आरोपी ओंकार घोडके (एमएच १३, डीएच ०१०९) या क्रमाकांची दुचाकी भरधाव वेगाने चालवित होता. त्यावेळी दुभाजक ओलांडणाऱ्या चाऊस यांना त्याची जोराची धडक बसली. धडकेत ते जबर जखमी होऊन मृत पावले.
या प्रकरणी मृताचे भाऊ इरफान अकबर चाऊस (वय ३७, रा.१६२, मजरेवाडी रोड,आनंद नगर भाग १ सोलापूर) यांनी फिर्याद दिली. पुढील तपास पोलिस नाईक पटेल हे करत आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज