mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

माढा की पंढरपूर? अभिजित पाटील कोठून निवडणूक लढवणार? पुढच्या 4 महिन्यात आमदार होणार, पाटलांनी विधानसभेसाठी फुंकले रणशिंग, वाढदिवसाला मोठं शक्तिप्रदर्शन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 2, 2024
in राजकारण, सोलापूर
नागरिकांनो! आमदारांना सरकारमध्ये किमंत नाही, पंढरपूर-मंगळवेढ्यासाठी एक ही रुपयाची योजना खेचून आणू शकले नाहीत; अभिजीत पाटील‌ यांनी केले आ.आवताडेंवरती गंभीर आरोप

टीम मंगळवेढा टाईम्स ।

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक राजकीय नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

अशातच पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी देखील विधानसभेच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे.

पुढच्या 4 महिन्यात मी आमदार होणार असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. त्यामुळं अभिजित पाटील विधानसभेच्या मैदानात उतरणार हे निश्चिम मानले जात आहे.

हजारो कार्यकर्त्यांचा जमाव, 40 जेसीबीमधून पुष्पवृष्टी

अभिजित पाटील यांचा काल वाढदिवस होता. यानिमित्त त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं. हजारो कार्यकर्त्यांचा जमाव, भलामोठा हार आणि 40 जेसीबीमधून सुरु असलेल्या पुष्पवृष्टीत अभिजित पाटील रात्री कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले.

कार्यकर्त्यांची एवढी गर्दी होती की या मार्गावरील वाहतूक दोन तास जॅम झाली होती. आज अभिजित पाटील काय बोलणार याकडे जिल्ह्यातील नेत्यांचे लक्ष लागले होते. यातच त्यांनी पुढच्या चार महिन्यात आमदार होणार असे सांगताच कार्यकर्त्यांनीही मोठा जल्लोष केला.

पंढरपूर-मंगळवेढा आणि माढा विधानसभा मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते पंढरपुरात

अभिजित पाटील यांच्या वाढदिवसासाठी केक देखील थेट विधानसभा इमारतीचा होता. त्यावर अभिजित पाटील यांचा फोटो लावलेला होता. तर स्टेजच्या मागचे बॅनर देखील विधानसभेचे बनवण्यात आले होते.

अभिजित पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी पंढरपूर-मंगळवेढा आणि माढा या दोन्ही विधानसभा मतदारसंघातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते दाखल झाल्याने पाटील कोठून लढणार याची उत्सुकता सर्वांनाच होती.

यावेळी बोलताना अभिजित पाटील यांनी पहिल्यांदा भाजपवर निशाणा साधत आपले जरा काही चांगले व्हायला लागले की आपल्या मागे लागले असे ते म्हणाले. मात्र, शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कुठे दोन पावले मागे घ्यायचे आणि कधी हल्ला करायचा हे ठरवल्याचे त्यांनी सांगितले.

नुकतेच राज्य सरकारने आर्थिक अडचणीत असलेल्या अभिजित पाटील यांच्या कारखान्याला 347 कोटीचे कर्ज मंजूर केले आहे. आता पाटील यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकत पुढच्या चार महिन्यात आपण आमदार होणार असल्याचा दावा केला.

भगीरथ भालकेंना टोला

सध्या जे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी इच्छुक आहेत, त्यांना तिकीट मिळणार आहे का? असा सवाल करत त्यांनी महाविकास आघाडीकडून इच्छुक असणाऱ्या भगीरथ भालके यांच्यावर निशाणा साधला. तर तिकडे माढ्यात आमदार बबनदादा शिंदे हे यावेळी मुलगा रणजितसिंह शिंदे यांना उभे करणार आहेत. तेही अभिजित पाटील इकडे येतो का? म्हणून घाबरु लागल्याचा टोला त्यांनी लगावला.

माढा की पंढरपूर? कोठून निवडणूक लढवणार?

दोन वर्षाची आपली पार्टी पण दोन्ही मतदारसंघातील सर्व पक्ष आपल्याला घाबरु लागल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी विधानसभा पंढरपूरमधून किंवा माढ्यामधून लढवायची याचा निर्णय देखील गनिमी काव्याने योग्यवेळी घेऊ असे पाटील म्हणाले.

पण यंदा चार महिन्यांनी आमदार होणार असे त्यांनी सांगितले. दोन्ही मतदारसंघावरील दावा त्यांनी कायम ठेवला आहे. अभिजित पाटील हे तरुण असून त्यांच्यामागे सोलापूर जिल्ह्यात तरुणाईची फार मोठी फौज आहे.

अशात आता ते कोणत्या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार, त्यावर अनेकांची भवितव्य अवलंबून असणार आहे. यातच मनोज जरांगे पाटील यांच्याशीही त्यांचे खूप जवळचे संबंध असल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीची डोकेदुखी वाढू शकते.

लोकसभा निवडणुकी दरम्यान विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर बँकेकडून जप्ती आणली होती. त्यानंतर अभिजित पाटील यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर लगेच कारखान्यावरील जप्ती हटवली होती.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: चेअरमन अभिजीत पाटील

संबंधित बातम्या

धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

तुफान दारू पिऊन नवरा-बायकोचा बेभान राडा, नगरसेवक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या महिलेने पतीचा गळा आवळून केला निर्घृण खून; या खुनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला

October 25, 2025
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकरी चिंतेत! पुन्हा पावसाचा जोर वाढला, ‘या’ दोन जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु; सोलापुरात मागील एक तासापासून तुफान पावसाची हजेरी

October 24, 2025
अभिमान! छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळा परिसर सुशोभीकरणाचे माजी सैनिक व जेष्ठ नागरिकांच्या भूमिपूजन; दगडाची घडण करून ऐतिहासिक रूप साकरण्यात येणार

मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पणसाठी; मनोज जरांगे पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री येणार तारीख ठरली

October 24, 2025
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

मोठी बातमी! सोलापूरच्या अप्पर जिल्हाधिकारी मोनिकासिंग ठाकूर यांना पदोन्नती; अप्पर जिल्हाधिकारीपदी यांना मिळाली पदोन्नती

October 24, 2025
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज सुधाकरपंत परिचारक यांच्या पुतळ्याचे अनावरण; दहा हजार मेट्रिक टन विस्तारीकरण गाळप शुभारंभ; शेतकरी मेळाव्याचे आयोजन

October 15, 2025
मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातून रामचंद्र सलगर शेठ उमेदवारी अर्ज दाखल करणार; ओबीसी उमेदवारीमुळे काटे की टक्कर होणार

दामाजीनगर गटातून रामचंद्र सलगर शेठ यांनी  निवडणूक लढवावी; विकासासाठी गटातील नागरिकांचा पुढाकार

October 15, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

लागा तयारीला! दर ‘इतक्या’ दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार; महत्वाची माहिती आली समोर

October 16, 2025
काय सांगताय! टीव्ही व फ्रिज, आटा चक्की, वॉशिंग मशीन, एस.सी खरेदीवर 7 हजारांची रेंजर सायकल डायरेक्ट फ्री म्हणजे इकदम फ्री!! अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये दिवाळी पाडवा निमित्त खास धमाकेदार ऑफर

काय सांगताय! टीव्ही व फ्रिज, आटा चक्की, वॉशिंग मशीन, एस.सी खरेदीवर 7 हजारांची रेंजर सायकल डायरेक्ट फ्री म्हणजे इकदम फ्री!! अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये दिवाळी पाडवा निमित्त खास धमाकेदार ऑफर

October 24, 2025
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

हिरमोड! मंगळवेढ्यात मातब्बर इच्छुकांची गोची, रिंगणातूनच बाहेर पडावे लागणार; नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी; चार गटात ‘ही’ नावे आघाडीवर

October 14, 2025
Next Post
लाडक्या बहिणींची ‘कटकट’ मिटली, सरकारचा नवा शासन निर्णय; आता विधानसभा क्षेत्रातच निपटारा होणार

नागरिकांनो! मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी करून घ्या; राज्य सरकारचे आवाहन

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पुन्हा मैदानात, शेतकरी संघटनांना जरांगेंची हाक; ‘या’ तारखेला राज्यातील शेतकरी संघटना, अभ्यासकांना बैठकीसाठी घातली साद

October 25, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

तुफान दारू पिऊन नवरा-बायकोचा बेभान राडा, नगरसेवक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या महिलेने पतीचा गळा आवळून केला निर्घृण खून; या खुनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला

October 25, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

Breaking! महिला डॉक्टर प्रकरण, पोलिसांची पत्रकार परिषद, आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती समोर तर नातेवाईकांनी केला ‘हा’ धक्कादायक खुलासा

October 25, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

‘बहिणीच्या नावावरील प्रॉपर्टीला स्टॅम्प ड्युटी नाही, प्रस्ताव विचाराधीन’; मंत्री आशिष शेलारांची मोठी घोषणा

October 24, 2025
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकरी चिंतेत! पुन्हा पावसाचा जोर वाढला, ‘या’ दोन जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु; सोलापुरात मागील एक तासापासून तुफान पावसाची हजेरी

October 24, 2025
अभिमान! छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळा परिसर सुशोभीकरणाचे माजी सैनिक व जेष्ठ नागरिकांच्या भूमिपूजन; दगडाची घडण करून ऐतिहासिक रूप साकरण्यात येणार

मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पणसाठी; मनोज जरांगे पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री येणार तारीख ठरली

October 24, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा