टीम मंगळवेढा टाईम्स।
पंढरपूर तालुका तालुक्यातील वेणूनगर येथील श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या ३० मार्च रोजी होणाऱ्या ‘ऑनलाईन’ वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी सर्व सभासदांना वार्षिक अहवाल द्यावेत.
तसेच कारखाना कार्यस्थळासह ६ गटात ६ ठिकाणी एलईडी स्क्रीन, माईक बसवून सभासदांची सोय करावी, अशी मागणी उद्योजक तथा सभासद अभिजीत पाटील यांनी कारखाना प्रशासनाकडे केली आहे.
यासंदर्भात पाटील यांनी लेखी निवेदन दिले असून त्यामध्ये म्हटले आहे की, गेली ३ वर्षे कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा झालेली नाही.
ज्यांनी ३ वर्षे ऊस घातला नाही किंवा वार्षिक सभेला हजर नसतील, अशांना आगामी निवडणुकीत मतदान करणे किंवा उमेदवार होण्यावर आक्षेप येऊ शकतो.
अनेक शेतकरी , सभासदांकडे ई – मेल अॅड्रेस व स्मार्ट फोन नाहीत.
यासह अनेक महत्वाच्या विषयांवर सभासदांचा वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रत्यक्ष सहभाग आहे. अनेक शेतकरी , सभासदांकडे ई – मेल अॅड्रेस व स्मार्ट फोन नाहीत.
त्यांना ‘ऑनलाईन’ सहभागी होऊन मत मांडणे अथवा संचालक मंडळाची भूमिका समजून घेणे शक्य होणार नाही. त्यासाठी कारखाना कार्यस्थळावर मैदानाच्या ५० टक्के क्षमतेनुसार सभासदांची सोय करावी.
यासह सर्व ६ गटांमध्ये ६ ठिकाणी एलईडी स्क्रीन , मंडप , साऊंड सिस्टीम , माईक अशा सोयी उपलब्ध कराव्यात. आपण स्वतः सभासदांसह या सभेसाठी कारखाना कार्यस्थळावर उपस्थित राहणार असून त्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध कराव्यात, असेही पाटील यांनी म्हटले आहे.
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज