मंगळवेढा टाइम्स नेटवर्क ।
मंगळवेढा पोलीस ठाण्यामध्ये चौकशीकामी बोलावलेल्या एका तरुणाने शुक्रवारी सकाळी ११ च्या दरम्यान विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने पोलीस प्रशासनासह तालुक्यात खळबळ उडाली.
तरुणाने अटक होण्याच्या भीतीने विष प्राशन केले असा अंदाज पोलिसांनी लावला असून पोलिसांनी तात्काळ त्याला पोलीस ठाण्याच्या शेजारीच असलेल्या संजीवनी खाजगी रुग्णालयात दाखल केल्याने पुढील अनर्थ टळला.
घरफोडीचा प्रकरणामध्ये मोहोळ तालुक्यातील अरबळी या गावातील शशिकांत शिवाजी घाडगे तरुणाला तपासकामी पोलिसांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात बोलाविले होते.
मंगळवेढा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर घरफोड्या व चोरीच्या घटना घडल्या असून या घटना उघड करण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. अशाच एका घटनेमध्ये मोहोळ तालुक्यातील संशयीतास पोलिसांनी बोलवल्यानंतर हा प्रकार घडला.
अटक करू नका म्हणत दिली औषध पिल्याची माहिती
मोहोळ तालुक्यातील अरबळी गावचा शशिकांत शिवाजी घाडगे याची चौकशी करण्यास सुरुवात करताच त्याने तुम्ही मला अटक करू नका मी आधीच औषध घेऊन आलेलो आहे असे सांगिल्याने आम्ही तात्काळ त्यास
साहाय्यक पोलीस निरीक्षक पिंगळे यांच्या गाडीतुन संजीवनी हॉस्पिटल येथे अॅडमिट केले असून त्याची प्रकृती ठीक आहे. त्याने स्वतःहून औषध पिल्याची कबुली दिलेली आहे. तसेच यापूर्वी त्याने पंढरपूर शहर येथे असाच प्रकार केला असल्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज