टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील सराफ गल्लीमध्ये चोरटयांनी बंद घराचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश करून लोखंडी कपाटाच्या लॉकरमधील 12 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी महिला संजीवनी सिध्देश्वर माळी दि.13 रोजी रात्री 8.00 वा. शनिवार पेठेत रहात असलेला भाऊ सुखदेव माळी यांचेकडे घराला कुलूप लावून गेल्या होत्या.
तेथे जेवण केल्यामुळे उशीर झाल्याने मुक्काम फिर्यादीने भावाकडेच केला. दि.14 च्या पहाटे 5.00 वा. भावाने मोटर सायकलवरून सराफ गल्लीतील घरी आणून सोडले.
यावेळी फिर्यादीस घराचा कडी कोयंडा उचकटलेला व दरवाजा उघडा दिसला.फिर्यादीने घरात जावून पाहिले असता खोलीतील लोखंडी लॉकरचा दरवाजा अर्धवट उघडा होता.
लॉकरमध्ये ठेवलेले 9 हजार रुपये किमतीचे 3 ग्रॅम वजनाचे झुबे, व तीन हजार रुपये किमतीचे एक ग्रॅम वजनाचा सोन्याचा बदाम असा एकूण 12000 रुपये किमतीला मुद्देमाल तेथे दिसून आला नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज