टीम मंगळवेढा टाईम्स ।
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालं आहे.पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
ईडीचे काही अधिकारी आज सकाळीच राऊत यांच्या घरी पोहोचले. त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक आहे. या सुरक्षा रक्षकांनी राऊत यांच्या घराबाहेर पहारा सुरू ठेवला असून कुणालाही आत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
ईडीने काही दिवसांपूर्वी राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचं अधिवेशन असल्याचं सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते.
तसेच त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. त्यानंतर आज अचानक ईडीचं पथक थेट राऊत यांच्या घरी पोहोचल्याने राऊत यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, राऊत यांच्या घरी ईडीची चौकशी किती काळ चालेल याबाबत काहीच सांगता येत नाही.आज सकाळी संजय राऊतांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालं आहे.
आज सकाळी संजय राऊतांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालं आहे. मागच्या अनेक दिवसांपासून संजय राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. संजय राऊत सद्या त्यांच्या कुटुंबियांसोबत घरी आहेत.
Mumbai | Enforcement Directorate officials reached Shiv Sena leader Sanjay Raut’s residence around 7am today; currently conducting a search and questioning Raut, in connection with Patra Chawl land scam case pic.twitter.com/e2bfEVW3s7
— ANI (@ANI) July 31, 2022
अनेक प्रकरणांमध्ये त्यांची आज चौकशी होण्याची शक्यता आहे. ईडीने दोनदा संजय राऊत यांना ईडीचं समन्स बजावण्यात आलं होतं. त्यावेळी मी कोणाला घाबरत नाही असं त्यांनी वारंवार सांगितलं होतं.
केंद्राच्या सांगण्यावरून आमच्यावर टीका केली जात असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं
संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता?
20 जुलै रोजी, ईडीने संजय राऊत यांना मुंबईच्या उपनगरातील चाळ प्रकल्पाच्या पुनर्विकासाशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात चौकशीसाठी बोलावले होते.
संसदेच्या अधिवेशनाचं कारण देत त्यांनी पुढची तारिख मागितली होती. त्यानंतर राऊत यांच्या वकिलाने बॅलार्ड इस्टेट येथील ईडी कार्यालयात जाऊन 7 ऑगस्टपर्यंत सूट मागितली होती.
मात्र, त्यांचा अपील त्यावेळी फेटाळण्यात आला. त्यानंतर आता ईडीने नवीन समन्स जारी करून राऊत यांना 27 जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले होते. आज संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर कितीवेळ चौकशी होणार हे कोणी सांगू शकत नाही. कारण यांच्या आगोदर ज्या राजकीय नेत्यांवर चौकशी झाली आहे ती अधिककाळ चालली आहे.(स्त्रोत; TV9मराठी)
नेमकं काय पत्राचाळ प्रकरण…
पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे, असा आरोप करण्यात आला आहे. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे.
ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे.
प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते.
उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.
संजय राऊतांना ईडीनं का पाठवलं समन्स?
ईडीनं 1 फेब्रुवारी रोजी ECIR दाखल केली होती. त्यानंतर प्रवीण राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याशी संबंधित मालमत्तांवर एकूण 7 ठिकाणांवर छापेमारी केली होती. त्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती.
प्रवीण राऊत शिवसेना नेते संजय राऊतांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच, प्रवीण राऊतांचं नाव PMC घोटाळ्यातही आलं होतं. ज्याचा तपास सुरु आहे.
याप्रकरणाच्या तपासादरम्यान असं आढळून आलं की, प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांच्या बँक खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या बँक खात्यात 55 लाख रुपये पाठवण्यात आले होते. ज्याचा वापर राऊत कुटुंबानं दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता. याप्रकरणी वर्षा आणि माधुरी यांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत.
सुजित पाटकर आणि संजय राऊत यांची मुलगी एका वाईन ट्रेडिंग फर्ममध्ये भागीदार आहेत. पाटकर यांच्या पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीनं अलिबागमध्ये भागीदारीमध्ये जमीन खरेदी केल्याचंही उघडकीस आलं आहे. त्यामुळेच संजय राऊत यांना ईडीनं समन्स बजावलं होतं.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज