टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील धनश्री मल्टिस्टेट को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि.,मंगळवेढा या संस्थेची वर्षिक सर्वसाधारण सभा आज रविवार दि.31 जुलै रोजी सकाळी 11 वा.वीरशैव मंगल कार्यालय मंगळवेढा येथे चेअरमन प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आल्याची माहिती सरव्यस्थापक रमेश फडतरे यांनी दिली.
या सभेत मागील 26 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे, सन 2021-22 सालचा वैधानिक लेखा परिक्षण अहवाल, ताळे बंदपत्रक, नफा-तोटा पत्रक मंजूर करणे,
संचालक मंडळाने मंजुर केलेल्या नफा वाटणीस मंजुरी देणे, वैधानिक लेखा परीक्षक यांची नेमणूक करणे, 2022-23 सालाकरिता तयार केलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे
चेअरमन यांच्या परवानगीने आयत्या वेळच्या विषय आदी विषयांवर चर्चा होणार असून सर्व सभासदांनी या सभेस उपस्थित रहावे असे, आवाहन संचालक मंडळानी केले आहे.
धनश्री महिला पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा
मंगळवेढा येथील धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा., मर्या. सोलापूर जिल्हा या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज रविवार दि.31 जुलै रोजी सकाळी 11.00 वा. पंढरपूर रोड, मंगळवेढा येथील वीरशैव मंगल कार्यालयात चेअरमन प्रा.शोभा काळुंगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आल्याची माहिती सरव्यस्थापिका सुनिता सावंत यांनी दिली.
या सभेत मागील 26 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे, सन 2021-22 सालचा वैधानिक लेखा परिक्षण अहवाल, ताळे बंदपत्रक, नफा-तोटा पत्रक मंजूर करणे, संचालक मंडळाने मंजुर केलेल्या नफा वाटणीस मंजुरी देणे,
वैधानिक लेखा परीक्षक यांची नेमणूक करणे, 2022-23 सालाकरिता तयार केलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे, चेअरमन यांच्या परवानगीने आयत्या वेळच्या विषय आदीवर चर्चा होणार असून सर्व सभासदांनी या सभेस उपस्थित रहावे असे आवाहन संचालक मंडळानी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज