टीम मंगळवेढा टाइम्स ।
गेल्या दोन महिन्यांत टोमॅटोला चांगला दर मिळाला होता. आता मात्र दरात घसरण सुरु आहे. पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथील नामदेव सरवळे या शेतकऱ्यांनी
आपल्या शेतातील ९०० किलो टोमॅटो कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी नेले असता हमाली, तोलाई व वाहतुक खर्च वजा करता केवळ ३४ रूपयाची पट्टी हातात आली.
कधी नव्हे ते गेल्या दोन महिन्यात टोमॅटोला उच्चांकी १०० ते १२० रूपये किलो इतर दर मिळाला होता. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत याचीच चर्चा होती. नेपाळ व इतर देशातून टोमॅटो आयात केले. दर वाढल्याचा पाहून अनेक शेतकरी टोमॅटो उत्पादनाकडे वळाले. त्यासाठी मोठा खर्चही केला
मात्र, गेल्या आठवड्याभरापासून दरात मोठी घसरण झाली असून, यामुळे शेतात केलेला खर्चही निघणे मुश्कील झाले आहे.
सोलापूर, मोडनिंब, कोल्हापूर बाजारपेठेत दोन ते तीन रूपये प्रतिकिलो इतका दर मिळत आहे. केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
खते, औषधे यांच्या किमतीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. मोठ्या अपेक्षेने चांगला दर मिळेल या आशेने टोमॅटो लागवडी केली. मात्र, दरात घसरण झाल्याने उत्पादन खर्च निघणेही मुश्किल झाले आहे. शेतमाल बांधावर टाकून देण्याची वेळ आली आहे.
ट्रॅक्टर खरेदीचे होते नियोजन…
टोमॅटो उत्पादनातून चांगले उत्पन्न मिळेल, आर्थिक स्थिती सुधारेल या आशेने मोठा खर्च केला आहे. मात्र, दरातील घसरणीने सारे नियोजन कोलमडले आहे. नवीन ट्रॅक्टर खरेदीचेही नियोजन होते.
मात्र, टोमॅटोतून केलेला खर्चही निघालेला नाही. वाहने खरेदी करणे रद्द केले आहे, असे नामदेव सरवळे यांनी सांगितले.(स्रोत:पुण्यनगरी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज