mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक! तीन वर्षांच्या मुलाचा गळा चिरून फेकलं मग लॉजवर…, IT इंजिनिअरचं भयंकर कृत्य

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 22, 2025
in क्राईम, राज्य
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

पुण्यातील खराडी चंदननगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका उच्चशिक्षित आयटी इंजिनिअरने आपल्या पोटच्या लेकराची निर्घृण हत्या केली आहे. बायकोसोबत झालेल्या वादानंतर आरोपी पतीने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

आरोपीने तीन वर्षांच्या मुलाचा गळा चिरून त्याला एका रस्त्याच्या कडेला निर्जनस्थळी फेकून दिलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

हिंमत माधव टिकेटी असं हत्या झालेल्या तीन वर्षीय मुलाचं नाव आहे. तर माधव साधुराव टिकेटी असं ३८ वर्षीय मारेकरी बापाचं नाव आहे. तो पुण्यातील एका आयटी कंपनीत नोकरीला आहे. तो पुण्यातील खराडी भागात आठ वर्षांची मुलगी, साडे तीन वर्षांचा मुलगा आणि पत्नीसह वास्तव्याला होता.

तो मुळचा विशाखापट्टनम येथील रहिवासी आहे. आरोपी माधव याचे मागील काही दिवसांपासून आपल्या पत्नीसोबत वाद सुरू होते. पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध सुरू असल्याचा संशय माधवला होता. यातून त्याचे अनेकदा पत्नीसोबत खटके उडत होते. गुरुवारी दुपारी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला.

याच वादानंतर आरोपीनं मुलाची निर्घृण हत्या केली आहे. सुरुवातीला आरोपीनं मुलगा हरवल्याचा बनाव रचला होता. पण संशय आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. यानंतर ही हत्याकांडाची घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर आरोपी माधव आपल्या साडे तीन वर्षांच्या मुलाला घेऊन घराबाहेर पडला होता. दोघंही घरात नसल्याने आरोपीच्या पत्नीने आरोपीला फोन केला.

मुलगा कुठे आहे? असं विचारलं. यावेळी मुलगा माझ्यासोबत आहे, मी सिगरेट प्यायला आलोय, अशी माहिती आरोपीनं पत्नीला दिली. पण बराच वेळ झाला तरी आरोपी परत घरी आला नाही. पत्नीने अनेकदा फोन करूनही आरोपी काहीच प्रतिसाद देत नव्हता.

गुरुवारी रात्री उशिरापर्यंत वाट पाहिल्यानंतर आरोपीच्या पत्नीने चंदननगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. आपला मुलगा आणि पती बेपत्ता असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता आरोपी माधव पुण्यातील एका लॉजमध्ये मद्यधुंद अवस्थेत झोपला असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी लॉजवर जाऊन आरोपीला ताब्यात घेतलं. मुलाबाबत चौकशी केली. तेव्हा आरोपीनं मुलगा हरवला असल्याचा बनाव रचला. पण पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीनं आपला गुन्हा कबुल केला.

तसेच मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह कुठे फेकला, याची माहिती देखील आरोपीनं दिली. गुरुवारी दुपारी मुलाची गळा चिरून हत्या केल्यानंतर आरोपी लॉजवर गेला होता. इथं त्याने मद्य सेवन केलं होतं, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आत्महत्यापुणे न्युज

संबंधित बातम्या

न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! मंगळवेढ्यात सख्खा भाऊच बनला ‘यमदूत’; कुऱ्हाडीच्या एका वाराने होत्याचे नव्हते झाले; खुनामागचं खरं कारण वाचून अंगावर येईल काटा

April 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

कारागृहातील ‘यारी’ पडली भारी! मंगळवेढ्यात भरदिवसा निर्जन स्थळी थरार; ३ लाखांचे दागिने आणि रोकड लंपास; गुन्हेगारांचे धाडस वाढले

April 11, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

पतीने केला क्रूरतेचा कळस! ​मुलगी दे, नाहीतर मारून टाकीन; पतीने माहेरी घुसून पत्नीला रक्ताळले; मंगळवेढ्यात थरार; पती, सासू अन् नणंदेचा निर्लयीपणा

April 11, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

धक्कादायक! जेवण खाल्ल्याच्या रागातून पोटच्या मुलाने आईच्या डोक्यात घातली कढई; मंगळवेढ्यातील संतापजनक घटना

April 9, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

कामाची बातमी! ‘या’ परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय

April 9, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

​अजब चोरी! मंगळवेढ्यात बँकेची तिजोरी सोडून चोरट्यांनी ‘भंगारा’वर मारला डल्ला; ‘हे’ साहित्य पळवून पोलिसांना दिले खुले आव्हान

April 9, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! मंगळवेढ्यात १४ वर्षांच्या बालिकेचा बेकायदेशीर विवाह; सासरच्या जाचाला कंटाळून चिमुरडीची आत्महत्या; जन्मदात्या आई-वडिलांसह पती, सासू-सासाऱ्यांवर गुन्हा दाखल

April 8, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

मोठी बातमी! भोंदूबाबाचा पाय आणखी खोलात; अशोक खरात विरोधात ‘हा’ गुन्हा दाखल

April 6, 2026
Next Post
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिलांसाठी आनंदाची बातमी! मंगळवेढा तालुक्यात प्रत्येक गावात आता बचत गटांना बचत भवन उभारण्यात येणार

ताज्या बातम्या

जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 13, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मंगळवेढेकरांची प्रतीक्षा आता संपणार ! महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा निश्चित; निधी कमी पडू देणार नाही; आमदार समाधान आवताडेंची ग्वाही

April 13, 2026
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

संतापजनक! घरजागा नावावर करण्यास नकार; पोटच्या मुलानेच वृद्ध आईला घराबाहेर हाकलले; न्यायासाठी वृद्धेची पोलिस अधीक्षकांकडे धाव

April 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

Breaking! मंगळवेढ्यात शासकीय नियमांची ऐशीतैशी; दालनात वाढदिवस साजरा करणे पडणार महागात; गटविकास अधिकारी यांचा अहवाल सादर करण्याचे पुण्यातून फर्मान

April 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा