mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक! महिला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या; डॉक्टरांनी एवढ्या टोकाची भूमिका का घेतली? तालुक्यात खळबळ

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 7, 2024
in आरोग्य, क्राईम, सोलापूर
Breaking! मंगळवेढ्यात उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

टीम मंगळवेढा टाईम्स। 

सांगोला शहरातील फॅबटेक कॉलेज वसाहतीत राहणारे व पंढरपूर येथील हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असलेल्या ३५ वर्षाच्या ऋचा सूरज रुपनर यांनी राहत्या घरी गुरुवारी सकाळी पावणेसातच्या पूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने सांगोला व पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी साळे यांनी एमएलसीद्वारे कळवले की,

डॉ. ऋचा यांनी फॅबटेक कॉलेज वसाहतीत गळफास घेतल्याने सूरज भाऊसाहेब रुपनर यांनी उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे सकाळी पावणेसातच्या सुमारास दाखल केले.

परंतु डॉक्टरांनी ऋचा रुपनर यांना तपासून पाहिले असता त्या उपचारापूर्वीच मृत झाल्या होत्या. त्यावरुन पोलिसांनी अकस्मात मृत दाखल करून पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरीक्षक जगताप यांच्याकडे पुढील तपास दिला.

सपोनी जगताप यांनी सांगितले की, मृताचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात न करता सोलापूर येथे इन कॅमेरा करण्याची मागणी मृताच्या नातेवाइकांनी केली आहे, त्यानुसार शवविच्छेदन सोलापूर येथे करून रात्री आठच्या सुमारास अंत्यविधी पंढरपूर येथे करण्यासाठी नातेवाइकांनी मागणी केली.

त्यानुसार अंत्यविधी झाल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्यात येणार आहे. डॉ.ऋचा यांचे पंढरपूर येथे गाडगे महाराज चौकात फॅबटेक हॉस्पिटल आहे.

सांगोला तालुक्यातील प्रसिद्ध उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांच्या त्या स्नुषा होत. त्यांचे पती सूरज हे डॉक्टर असून दोघे पती-पत्नी पंढरपूर येथे हॉस्पिटल चालवीत होते. त्यांचा विवाह बारा वर्षांपूर्वी झाला असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे.

डॉ.ऋचा यांनी एवढ्या टोकाची भूमिका का घेतली याबाबत तर्कवितर्क केला जात असून या दुःखद घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: डॉक्टर आत्महत्या

संबंधित बातम्या

सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

काय झाडी, काय डोंगर… अन काय तो पेपर! भूगोलाच्या पेपरात ‘नापास’ होण्याची भीती, पठ्ठ्यानं थेट प्रश्नपत्रिकाच केली चोरी

March 20, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढा हादरलं! चाकूचा धाक दाखवून भरवस्तीत घरफोडी; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

March 18, 2026
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नदी वाचवा, निधी द्या! भीमेच्या शुद्धीकरणासाठी १०० कोटी द्या; आमदार आवताडेंची सरकारकडे आग्रही मागणी; विधानसभेत घुमवला आवाज

March 17, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! ​गरीबांच्या हक्काच्या पैशावर डल्ला; लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी अटकेत

March 17, 2026
Next Post
जोपर्यंत ‘त्या’ तलाठ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; प्रहार संघटना आक्रमक; तलाठ्यावर कारवाई का होत नाही?

जोपर्यंत 'त्या' तलाठ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; प्रहार संघटना आक्रमक; तलाठ्यावर कारवाई का होत नाही?

ताज्या बातम्या

सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

काय झाडी, काय डोंगर… अन काय तो पेपर! भूगोलाच्या पेपरात ‘नापास’ होण्याची भीती, पठ्ठ्यानं थेट प्रश्नपत्रिकाच केली चोरी

March 20, 2026
वृक्षारोपणाने गुंफले सामाजिक उत्तरदायित्व! श्री वैभवलक्ष्मी महिला पतसंस्थेचा ३रा वर्धापनदिन दिमाखात साजरा

वृक्षारोपणाने गुंफले सामाजिक उत्तरदायित्व! श्री वैभवलक्ष्मी महिला पतसंस्थेचा ३रा वर्धापनदिन दिमाखात साजरा

March 20, 2026
विश्वासार्हता आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर ‘श्रीकृपा अर्बन’ प्रगतीपथावर राहील: आमदार समाधान आवताडे यांचे गौरउद्गार

विश्वासार्हता आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर ‘श्रीकृपा अर्बन’ प्रगतीपथावर राहील: आमदार समाधान आवताडे यांचे गौरउद्गार

March 20, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

March 20, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! आता ‘तारीख पे तारीख’ नाही; कोर्टाच्या तारखांनी हैराण झाला असाल तर ही बातमी वाचाच

March 20, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..