टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील बालाजीनगर येथे शासकीय जागेचा वापर हे खाजगी मालकीचा आहे असे वाटणारे पुढारी आता प्रहार रस्त्यावर आणुन सोडणार आहे.
आता सुसज्ज लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी काढलेली पतसंस्था सरकारी जागेवर न भाडे भरता वापरत आहेत. या पतसंस्थेच्या पाठीशी कोणी आहे, याचा उलगडा प्रहार लवकर करणार आहे.
आज प्रहारचे अजय राठोड, संजय राठोड, अशिष पवार यांनी स्वतः भेट दिली व डोळ्यांनी बघितले. तिथले कर्मचारी आळी मिळी गुप चिळी या म्हणीप्रमाणे गप्प बसतात.
यापुढे या संस्थेची ग्रामपंचायतला काहीही मदत नसते व करही नाही, भाडे ही नाही या संस्थेवर आता गावातील ग्रामपंचायत काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
जर कारवाई करण्याचे टाळाटाळ केली तर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या आदेशानुसार व मंगळवेढा तालुक्यातील प्रहारचे समाधान हेंबाडे, राकेश पाटील, सिदराया माळी, युवराज टेकाळे यांना सोबत घेऊन याविरोधात मोठा लढा उभा करणार आहे.
सध्या गावातील लोकांना पावसाळ्यात सुध्दा पिण्यासाठी पाणी नाही. जलजीवनचे काम नुसतेच नावाला झाले आहे या कामावर ठेकेदार, अधिकारी हे मालामाल झाले. पण गावातील लोक पाण्यासाठी फिरत आहेत,
गावात लाईट नसते गावाच्या पाचवीला या पुढाऱ्यांनी अंधार पुजला आहे डी. पी. चा खोळंबा सारखा आहे, एसटी बस स्टॉपवर गेले की त्यावर पत्रे नाही, स्मशानभूमीत गेले की लाज वाटते अशा अनेक प्रश्नांना गावकऱ्यांना तोंड द्यावे लागते. पण यापुढे गावातील भ्रष्टाचार प्रहार संघटनेच्या माध्यमातून बाहेर काढणार आहे.
गावातील राजकीय लोकांनी लमाणतांड्याचा विकास न करता स्वतःचा केलेला आहे हे गावकऱ्यांना लक्षात आले आहे. त्यामुळे या लोकांना मते मागण्याचा सुद्धा अधिकार राहिला नाही.
यापुढे गावातील झालेला भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे काम मी करणार आहे असे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष संजय राठोड यांनी सांगितले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज