टीम मंगळवेढा टाईम्स ।
शिवसेना (उ.बा.ठा) या गटाकडून मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेची उमेदवारी सिध्देश्वर आवताडे यांना देण्यात यावी अशी मागणी युवासेनेचे शहर प्रमुख सागर वाघमारे यांनी थेट उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
पंढरपुर-मंगळवेढा विधान सभा मतदार संघ-२५२ मध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुक मतदार संघातुन महाविकास आघाडी यांचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (उ.बा.ठा) या पक्षाकडे पहिल्यापासुन मतदार संघ होता
येणारी विधानसभा निवडणुक शिवसेना (उ.बा.ठा) याच पक्षाकडे रहावा व शिवसेना (उ.बा.ठा) या पक्षातुन सिध्देश्वर बबनराव आवताडे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी मंगळवेढा युवासेना शहर प्रमुख सागर वाघमारे यांनी केली आहे.
मंगळवेढा तालुक्यातुन बबनराव आवताडे यांचा प्रत्येक गावामध्ये गट मोठया प्रमाणात सक्रिय आहे तसेच स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्था बबनराव आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असुन
त्यांचा एक स्वातंत्र्य गट व खरेदी-विक्री संघाचे चेअरमन व श्री. संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक यांच्या मागील युवकांची फौज व यांच्या मागे असलेले युवक कार्यकर्ते मोठया प्रमाणात असुन
ज्येष्ठांपासुन युवकांपर्यंत मोठा जनसंपर्क असुन गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदे यांना पाठींबा देवुन मोठ्या मताधिक्याने निवडुन आणण्याचे काम सहकाररत्न बबनराव आवताडे व सिध्देश्वर आवताडे यांच्या पाठीमागे असलेल्या गटांनी केले आहे.
येणारी विधानसभा पंढरपुर-मंगळवेढा मतदार संघातुन युवकांचे आशास्थान असलेले सिध्देश्वर आवताडे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी शिवसेना (उ.बा. ठा) पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे अशी माहिती युवासेना शहर प्रमुख सागर वाघमारे यांनी दिली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज