टीम मंगळवेढा टाईम्स।
कोरोनाची रुग्णसंख्या शून्य असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यात तब्बल एक महिन्यानंतर मरवडे येथे एक रुग्ण सापडला आहे.
यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून, नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भाऊसाहेब जानकर यांनी केले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तालुक्यात अक्षरशः हाहाकार माजवला होता. अनेक लोकांना आपल्या आप्तेष्टांना गमवावे लागले. दुसरी लाट अनेकांचे जीव घेऊन ओसरली.
त्याचबरोबर तिसरी लाटही ओसरल्यानंतर कोरोना बराच थंडावला होता. त्यामुळे निर्बंध उठले. तोंडावरचा मास्क दूर झाला.
दरम्यान जिल्ह्यातील शेजारच्या पंढरपूर, सांगोला या तालुक्यांतही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.
कोरोनापासून नागरिकांनी बचावासाठी प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे. ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात बूस्टर डोस उपलब्ध आहे,
तसेच १२ ते १८ वर्षातील विद्यार्थ्यांनी, तरुणांनी लसीकरण करून घ्यावे तसेच कोरोनापासून बचावासाठी तोंडावर मास्क, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टसिंगचे पालन करावे, असे मंगळवेढेतील तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भाऊसाहेब जानकर यांनी सांगितले.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज