मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथून एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,फिर्यादी पोपट जोध (रा.भोसे) यांचा हार्डवेअरचा व्यवसाय असून दि.18 रोजी सकाळी 6.15 वा. अल्पवयीन मुलगा हा घरातून भैरवनाथ मंदिरात देवाच्या आरतीसाठी जातो असे सांगून
हिरो होंडा मोटर सायकल क्रमांक एम एच 13,ए.यू.1224 या गाडीवरून घरातून निघून गेला. तो बराच वेळ होवूनही परत न आल्याने फिर्यादीने मंदिरात जावून चौकशी केली असता
तो आरतीला आला परंतू देवाची आरती संपल्यावर तो लगेच निघून गेला आहे असे मंदिरात आलेल्या आजूबाजूच्या लोकांनी सांगितले.
फिर्यादीने भोसे गावात व आजूबाजूच्या परिसरात नातेवाईकांकडे सर्वत्र त्याचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही.फिर्यादीची खात्री पटली की मुलगा अल्पवयीन असल्याचा फायदा घेवून अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाकरीता फूस लावून पळवून नेले आहे.
त्याचे वर्णन -वय 14 वर्षे 9 महिने,अंगाने सडपातळ,रंग सावळा,चेहरा उभट,उंची 5 फुट,अंगात नेसणेस गुलाबी रंगाचा टी शर्ट,त्यावर चांगभले लिहिलेले. अंगात नाईट पँट काळपट निळसर रंगाची, अशा वर्णनाचा मुलगा कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज