टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-घरनिकी रस्त्याच्या बाजूला बोलत उभ्या असलेल्या आरोग्य सेविकेला भरधाव वेगाने पाठीमागून मोटर सायकलस्वाराने येवून
जोराची धडक दिल्याने त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या असून या प्रकरणी बाबूराव उध्दव माने (रा.मारापूर) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील जखमी फिर्यादी आरोग्य सेविका शैला सचिन जाधव (चेळेकर गल्ली रा.मंगळवेढा) या दि.19 रोजी सकाळी 9.30 वाजता
घरनिकी उपकेंद्रात कर्तव्यावर एम.एच. 13 सी.सी. 2663 या दुचाकीवरुन जात असताना चौगुले वस्ती येथे आल्यावर फिर्यादीच्या ओळखीच्या आशा वर्कर रिजवाना शेख व अश्विनी गायकवाड या भेटल्याने
फिर्यादीने त्यांची दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेवून बोलत असताना वरील आरोपीने पाठीमागून भरधाव वेगाने येवून वाहतूकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करीत त्याच्या ताब्यातील
हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस धडकल्याने फिर्यादीच्या डाव्या पायास व दोन्ही हातास जखम करुन गाडीचे दोन हजाराचे नुकसान करुन पळून गेला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज