टीम मंगळवेढा टाईम्स ।
पोलिसांनी तपासाअंती न्यायालयात प्रकरण सादर केल्यानंतर सुनावणीसाठी तारीख दिली जाते. मात्र, अनेक साक्षीदार व आरोपी न्यायालयाने बजावलेल्या समन्स, वॉरंटला जुमानत नाही.
या प्रकारामुळे न्यायप्रक्रियेत अडथळा निर्माण होत असल्याने, न्यायालयाने १७ एप्रिल रोजी अशा ७ आरोपींवर दंडात्मक कारवाई केली.
खटल्यावरील युक्तिवादानंतर निर्णय दिला जातो. मात्र, अनेक प्रकरणात साक्षीदार व आरोपी तारखेला हजर राहात नाही.
परिणामी, न्यायालयात प्रकरणांच्या सुनावणीता विलंब होतो आणि गुन्हेगार सुटण्याचे प्रमाण वाढते. पाला पायबंद बसावा म्हणून तसेच दाखल गुन्ह्यातील साक्षीदार, आरोपी न्यायालयाने दिलेल्या तारखेला उपस्थित राहावे,
याकरिता १७ एप्रिल रोजी न्यायालयाने ४ गुन्ह्यात ५ आरोपींना प्रत्येकी १ हजार रुपये दंड २ स्टॅण्डिंग वॉरंटमधील एका आरोपीला १५०० रुपये दंड व एका आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली.
जिल्हातील दाखल गुन्हयातील आरोपी साक्षीदारांनी न्यायालयाने समन्स, बॉस्टनुसार आदेशाच्या दिवशी न्यायालयात उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
त्यामुळे वॉरंट, समन्समध्ये दिलेली तारीख व वेळेवर उपस्थित न राहणाऱ्यांवर कारवाई करून गुन्हे दाखले केले जाऊ शकतात. न्यायप्रणालीस व पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (स्रोत:तरुण भारत गोंदिया)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज