मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर जिल्ह्यातील आठ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल आहे. करण्याच्या दिवशी मोहोळ बाजार समितीच्या १८ जागांसाठी १८ अर्ज आल्याने ही बाजार समिती बिनविरोध झाली आहे.
उर्वरित दुधनी, अक्कलकोट, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, कुर्डुवाडी, अकलूज या सात बाजार समित्यांसाठी मतदान की बिनविरोध या संदर्भातील चित्र आज स्पष्ट होणार
अक्कलकोट व दुधनी बाजार समितीच्या माध्यमातून आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजीमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यातील राजकीय डाव व प्रतिडाव बघायला मिळत आहेत.
पंढरपूर, कुर्डुवाडी, सांगोला, मंगळवेढा या बाजार समित्यांमध्ये कशा लढती होणार? या बद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
बाजार समितीसाठी पात्र ठरलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज अंतिम मुदत आहे. आज दुपारी बाजार समितीच्या लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.
निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी व उमेदवारांना चिन्ह वाटप शुक्रवारी होणार आहे. जिल्ह्यातील सात बाजार समित्यांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. २८ एप्रिल व ३० एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ३० एप्रिल रोजी बाजार समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज