mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोटारसायकल चोरणारी अट्टल टोळी मंगळवेढा पोलिसांच्या जाळ्यात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मोटारसायकल चोरणारी अट्टल टोळी मंगळवेढा पोलिसांच्या जाळ्यात


मंगळवेढा:समाधान फुगारे


सोलापूर,मंगळवेढा, सांगली,मिरज,विजापूर  विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये दुचाकी मोटारसायकलची चोरी करणारी टोळी मंगळवेढा पोलिसांच्या जाळ्यात सापडली आहे.संभाजी हणमंत नलवडे (वय 26), प्रसन्ना उर्फ गोटया प्रकाश कल्ली (वय 22 ) .(दोघे रा.संख ता .जत जि .सांगली) व कुमार तानाजी पाटील (रा .बोराळे ता . मंगळवेढा) या तिघांना मंगळवेढा पोलिसांनी अटक केली आहे.

जाहिरातीसाठी संपर्क:7588214814


 आरोपीवर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून २० दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. त्यांनी चडचण, अथणी,इरकल परिसर व शहरातील दुचाकी चोरल्या आहेत, अशी माहिती  उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील  यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंगळवेढा पोलिसांना दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. दोन इसम मरवडे येथील हॉटेल महाराजा समोर चोरीची बिगर नंबरची हिरो एचएफ डीलक्स मोटर सायकल विक्री करिता येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली असल्याने मंगळवेढा पोलीस ठाणेचे पोसई पुजारी,स.फौ राऊत ,पो.ना  सुनिल मोरे , पो.कॉ अनिल दाते हे खाजगी वाहनाने मरवडे येथे जावून मिळाले बातमीप्रमाणे हॉटेल महाराजा येथे जावून आजबाजुस थोडया थोडया अंतरावर वॉच करीत थांबले होते

दि. २८ जानेवारी रोजी दुपारी २.१५ च्या सुमारास हुलजंती कडून येणारे रोडने दोन इसम लाल रंगाची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल वरुन हॉटेल महाराजा समोर येवून थांबले असता त्यांना जागीच पकडले व त्यांना नाव पत्ता विचारले असता मोटारसायकल चालविणारे इसमाने आपले नाव संभाजी हणमंत नलवडे (वय 26 वर्षे रा .संख ता . जत जि . सांगली) व पाठीमागे बसलेल्या इसमाने आपले नाव प्रसन्ना उर्फ गोटया प्रकाश कल्ली (वय 22 वर्षे) . त्यांना पोलीसांनी त्यांचे ताबेत असलेल्या मोटारसायकलचे कागदपत्र व लायसन बाबत विचारपुस करता ते उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देवू लागले व कावरेबावरे झालेने त्यांचा पोलीसांना संशय आल्याने त्यांना अधिक विश्वासात घेवून मोटारसायकल बाबत विचारपुस करता त्यांनी सदरची मोटारसायकल ही गेल्या 5 – 6 महिन्यापूर्वी मंगळवेढा शहरातील हॉटेल शिवनेरी चे समोरुन डुप्लीकेट चावीचा वापर करुन चोरलेली असल्याचे त्यांनी समक्ष सांगितले .

त्याप्रमाणे पोसई पुजारी यांनी ताब्यात घेवून पोलीस ठाणेत हजर केले व त्यानंतर पोलीसांनी त्यास मंगळवेढा पोलीस ठाणे गु . र . नं . 47 / 2020 भा . दं . वि . क . 379 , 34 या गुन्हयात अटक करुन त्याचेकडे अधिक तपास केला असता यातील आरोपी यांनी महाराष्ट्रातील सांगली , मिरज , सोलापूर , मंगळवेढा येथून तसेच कर्नाटक राज्यातील विजापूर , अथणी , इरकल , चडचण येथून चोरुन आणल्या असल्याचे व त्यांची बोराळे परिसरात विक्री करणेकरीता त्याचा नातेवाईक कुमार तानाजी पाटील (रा . बोराळे ता . मंगळवेढा) याचे ताब्यात दिलेली असल्याची कबुली दिल्याने त्यांचेकडे 9 मोटारसायकली हस्तगत करण्यात आलेल्या असून सदर गुन्हयाचे कामी कुमार तानाजी पाटील यास अटक करण्यात आलेली आहे .

तसेच उर्वरीत आरोपी नं . 1 संभाजी हनुमंत नलवडे रा संख ता . जत जि सांगली याचे माहितीप्रमाणे चोरलेल्या 10 मोटारसायकल त्याचे घरातून व शेतातुन जपत करुन ताब्यात घेतलेल्या आहेत .

सदरची कामगिरी मनोज पाटील , पोलीस अधीक्षक , अतुल झेंडे अपर पोलीस अधीक्षक , सोलापूर ग्रामीण ,दत्तात्रय पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी , मंगळवेढा विभाग मंगळवेढा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे , पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी , सहा . फौजदार संजय राऊत , पोलीस नाईक / सुनिल मोरे , पोकॉ / अनिल दाते , पोकॉ / अजित मिसाळ यांनी केलेली असून सदर गुन्हयाचा तपास सहा . फौजदार संजय राऊत हे करीत आहेत व सदर आरोपींनी आणखी 2 मोटारसायकली , एक ट्रेलर चोरली असल्याची कबुली दिली असून त्या अनुशंगाने तसेच त्यांचे आणखी साथीदार असण्याची शक्यता असल्याने त्या अनुशंगाने तपास चालू आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeMangalWedha

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
जात वैधता प्रमाणपत्राची  फेरतपासणी करण्याचे निर्देश

जात वैधता प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

भयंकर निष्काळजीपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सने केली प्रसूती; निष्पाप माता-बाळाचा बळी, चितेच्या राखेत पुरावा

June 22, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा! राजकारण की समाजकारण? मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना थेट आव्हान; नेमका प्लॅन काय?

June 22, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

सावधान! मंगळवेढा बस स्टँडवर चोरटे सक्रिय; वृद्धेचे दागिने आणि रोकड लंपास, गुन्हा दाखल; प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

June 22, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

June 21, 2026
३ वर्षांचं वय अन् काळजाचा थरकाप उडवणारा विक्रम! पोलीस पुत्राने १४ पायऱ्यांची उभी भिंत चढून जाज्वल्य डोरलेचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये इतिहास रचला

३ वर्षांचं वय अन् काळजाचा थरकाप उडवणारा विक्रम! पोलीस पुत्राने १४ पायऱ्यांची उभी भिंत चढून जाज्वल्य डोरलेचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये इतिहास रचला

June 21, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

शेतकऱ्यांच्या संयमाचा विजय! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात शेतीसाठी मिळणार आता आठ तास वीज; ‘टाळे ठोकू’ इशाऱ्याची प्रशासनाने घेतली धडक दखल

June 21, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा