टीम मंगळवेढा टाईम्स।
अभिनेते मकरंद अनासपुरेंचा विहीर चोरी झाल्याचा चित्रपट आपण सर्वांनी पहिला असेल. यात अनासपुरे यांनी विहरी चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. तसेच सदरील विहीर शोधून देण्याची मागणी केली होती. अशी घटना मंगळवेढा तालुक्यात घडली आहे.
सलगर (ब्रु) या गावातील अंकुश सौदागर जाधव या शेतकऱ्याने मंगळवेढा पोलीस ठाण्यात विहीर गायब झाल्याची तक्रार केली आहे.
याप्रकरणी विठ्ठल तुकाराम जाधव, नवनाथ विठ्ठल जाधव, संजय विठ्ठल जाधव (सर्वजण रा.सलगर बु ता.मंगळवेढा यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दि.7 सप्टेंबर रोजी दुपारी 1 च्या सुमारास फिर्यादी अंकुश सौदागर जाधव यांच्या शेतात सलगर (ब्रु) गावात घडली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, यातील आरोपी विठ्ठल तुकाराम जाधव, नवनाथ विठ्ठल जाधव, संजय विठ्ठल जाधव व फिर्यादी अंकुश जाधव यांची सामाईक विहीर असून वरील आरोपींनी सामाईक विहीर मुजवुन नुकसान केले आहे.
त्याचबरोबर फिर्यादीस व त्यांची पत्नी वैशाली यांना शिवीगाळी दमदाटी करून तुम्ही विहीरीकडे आला तर जिवंत सोडणार नाही अशी जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.
सध्या दक्षिण भागात पाऊस पडला नाही म्हणून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच ऐन दुष्काळात विहीर मुजवून शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले असल्याचे दिसून येत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक सचिन बनकर हे करीत आहेत.
महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज