टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील मित्रनगर येथून घरासमोर लावलेली एका डॉक्टरची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी पळविली आहे.
या घटनेची हकीकत अशी, यातील फिर्यादी डॉ.निखिल जोशी हे मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात सेवेत आहेत.
त्यांचा मोठा भाऊ शेती व्यवसाय करत असल्याने घरगुती वापरासाठी फिर्यादीच्या नावावर असलेली मोटारसायकल (क्र. एमएच १३ एवाय ६६४६) दि. ६ नोव्हेंबर रोजी रात्री ९.५० वाजता
अॅड. योगेश जाधव (रा. मित्रनगर) येथे त्यांच्या घरी आजी आजारी असल्याने औषधोपचार करण्याकरिता फिर्यादी लावून गेले होते.
सदर लावलेल्या ठिकाणी पुन्हा मोटारसायकल दिसून आली नाही. मंगळवेढा शहर व परिसरात तिचा शोध घेतला; मात्र ती मिळून न आल्याने चोरट्याने चोरून नेल्याची खात्री पटल्याने अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज